parali.jpg 
मराठवाडा

पवारांवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ परळी बंदला प्रतिसाद भेटत आहे. गुरुवारी (ता. २६) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहणानंतर बंद पाळण्यात येत आहे.  मुख्य बाजारपेठेसह शाळा,महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिखर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी नाव नसतानाही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. म्हणून शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी (ता.२५) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले होते.

या आंदोलनामध्ये गुरुवारी परळी शहर बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते मोटारसायकल फेरी काढून आपापले व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन करत होते. या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील सर्व प्रमुख व्यवहार सकाळपासून बंद आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय ही बंद ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT