file photo 
मराठवाडा

निवृत्त शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण - काय आहे प्रकरण वाचा 

नवनाथ येवले

नांदेड :  कर्तव्य बजावताना केलेल्या अपराधाच्या शीक्षेला निवृत्तीनंतर उतारवायात सामोरं जाण्याचा प्रसंग ओढावला आहे नांदेड जिल्ह्यातील एका तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यास. लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार शाळांना बोगस पुर्नमान्यता व शिक्षकांच्या बोगस मान्यता प्रकरणी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम राचुरे यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने फरार आरोपींचा जामिन अर्ज फेटाळल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी निवृत्त एकनाथ मडावी शुक्रवारी (ता.१३ मार्च २०२०) रामतिर्थ पोलिसांना शरण आल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

पटपडताळणीमध्ये लोकशिक्षण प्रसारक मंडळ बिजुर (ता. बिलोली) या संस्थेच्या चार शाळांची मान्यता रद्द करण्यात आल्या. त्यानंतर शासनस्तरावर खोटा पत्रव्यवहार करुन चारही शाळांना  बोगस पुर्नमान्यता मिळविल्या. दरम्यान संस्थेच्या पुर्नमान्यतेसाठी बोगस अध्यक्ष, वर्ग मान्यता, बोगस मुख्यध्यापक, बोगस संचमान्यता, बोगस आनुदान मान्यता व शिक्षकांच्या बोगस मान्यता प्रकरणी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात संस्थेच्या संचालक मंडळासह तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ मडावी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

तपास यंत्रणेची पथके रवाना
गुन्ह्याचे स्वरुप लक्षत घेवून तत्कालीन पोलिस अधिक्षक संजय जाधव यांनी प्रकरणाचा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे सापेविला. संस्थेचे विक्रम राचुरे यांना शिक्षण उपसंचालक कार्यालय लातुर परिसरातून अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. दरम्यान  न्यायालयाने विक्रम राचुरे यांची करागृहात रवानगी केली. तत्कालीन शिक्षणाधिकारी (सेवानिवृत्त) एकनाथ मडावी यांचा जामिन अर्ज फेटाळून दोन दिवसात सबंधीत पोलिस ठाण्यात शरणागती पत्कारण्याचे आदेश दिले.

त्यानुसार श्री. मडावी शुक्रवारी रामतिर्थ पोलिसांना शरण आले. रामतिर्थ पोलिस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत अटकेची प्रक्रीया सुरू होती. मडावी यांच्या शरणागतीमुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची चर्चा जिल्हा परिषदेत दबक्या आवाजत सुरु आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी तपास यंत्रणेची पथके रवाना करण्यात आली आहेत. 

आरोपींची संख्या वाढली 
बोगस मान्यता प्रकरणी आरोपींची संख्या वाढली आहे. सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी माडावी शरणागती नंतर तपास यंत्रणा फरार आरोपींच्या मागावर आहे. त्यामुळे बिजुर प्रकरणामध्ये अरोपींच्या संख्या व नेमके आरोपी कोण याकडे आता लक्ष लागले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

Ganeshotsav Police Guidelines : करमाडमध्ये गणेश मंडळांना पोलिसांचा सल्ला; डीजेचा दणदणाट टाळा, रक्तदानाचा आदर्श घडवा

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

SCROLL FOR NEXT