Hingoli Crime Update esakal
मराठवाडा

हिंगोलीत महसूल पथकाने पाठलाग करताच वाळूमाफियांनी वाळू टाकली रस्त्यावर

औंढा-हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर वाळू टाकून पळ काढला.

दत्तात्रय शेगूकर

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळुची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या पाठीमागे शनिवारी (ता.२९) रात्री महसूलचे पथक लागल्याने वाहनधारकाने औंढा-हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर वाळू टाकून पळ काढला. मात्र रस्त्यावर टाकलेल्या वाळुच्या ढिगाऱ्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय झाली. औंढा (Aundha Nagnath) तालुक्यातील पूर्णा नदीच्या सर्व घाटावर तहसीलमधील महसूलचे पथक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची धरपकड सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी महसूलच्या पथकाने १५० ब्रास वाळू व दुसऱ्या दिवशी दोन ट्रॅक्टर पकडले. त्यामुळे वाळूमाफियांची धाबे दणाणले आहेत. दरम्यान, शनिवारी रात्रीला महसूल पथक वाहनाच्या पाठीमागे लागल्यामुळे वाळुची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकाने वाहनातील वाळू औंढा - हिंगोली (Hingoli) रोडवरच टाकून दिली व त्या ठिकाणाहून पळ काढला. (Revenue Team Follow Sand Vehicle In Hingoli)

वाहनातील वाळू रोडवर टाकल्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. औंढा महसूल विभागाच्या वतीने अवैधरीत्या गौण खनिज वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे. त्यामुळे सध्या वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT