chikhlikar.jpg 
मराठवाडा

खासदार चिखलीकरांनी घेतली आढावा बैठक

हफिज घडीवाला


कंधार, (जि. नांदेड) ः जिल्ह्यात एकही पाझेटिव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही. ही बाब आपल्यासाठी समाधानकारक असली तरी कोरोनाबाबत आपल्याला गंभीर राहणे आवश्यक आहे. कोरोना महामारी आहे. त्याचा सर्वांनी मिळून मुकाबला करण्याची गरज आहे. सर्व जनतेने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोरोनापासून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.


जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
शनिवारी (ता. २८) दुपारी येथील तहसील कार्यालयात सोशल डिस्टन्स ठेवून आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोरोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या वेळी त्यांनी निराधारांच्या भोजन, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी, बाहेर गावांहून येणाऱ्यांबाबत उचललेले पाऊल, ग्रामीण भागात करण्यात येणारा धान्य पुरवठा आदींची माहिती घेतली.


एक लक्ष सत्तर हजार कोटींची तरतूद
या वेळी बोलताना चिखलीकर म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी एक लक्ष सत्तर हजार कोटींची तरतूद केली आहे. राज्य सरकारही वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. प्रत्येकाला तीन महिने सरकार रेशन उपलब्ध करून देणार आहे. ज्यांच्याकडे कोपन कार्ड नाही अशांना तहसीलदारांनी आधारकार्डावर रेशन उपलब्ध करून घ्यावे. लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर गोंधळ करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. कोरोना रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाला मदत करावी.’’


गरजू लोकांना अन्नदान
या वेळी उमरज संस्थाने मठाधिपती संत श्री एकनाथ गुरू नामदेव महाराज यांनी लॉकडाऊनच्या काळात संस्थानतर्फे ग्रामीण भागातील गरजू लोकांना अन्नदान करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहयता निधीस २१ हजारांचा धनादेश चिखलीकरांकडे सुपूर्द केला.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार सखाराम मांडवघडे, गटविकास अधिकारी रहाटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे, पोलिस निरीक्षक जाधव, नायब तहसीलदार विजय चव्हाण, वैधकीय अधीक्षक डॉ. फिस्के, पालिकेचे उपाध्यक्ष महोम्मद जफरोद्दिन, डॉ. राजपूत, मंडळाधिकारी शेख, प्राचार्य किशन डफडे, नगरसेवक शेख आसिफ, सुनील कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT