हिंगोली बाजारपेठेसाठी नविन नियमावली 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात दुकानांसाठी सुधारित आदेश; खानावळ, रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के ग्राहक

खानावळ रेस्टॉरंट यांना कोरोना नियमांचे पालन करत ग्राहकांच्या ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पुढील आदेशापर्यंत दैनदिन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत उघडण्यास परवानगी राहील.

राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आस्थापना व दुकाने चालू करण्यासाठी जिल्ह्यातील सणांची सद्यस्थितीचा विचार करुन शासन स्तरावरुन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्देशानुसार आणि हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची सद्यस्थितीनुसार जिल्हा लेवल दोन मध्ये येत असल्याने दिलेल्या सूचना कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शनिवारी ( ता. १९ ) पासून आस्थापना, दुकाने, खानावळ, रेस्टॉरंट उघडण्यासाठीच्या वेळेत व नव्याने उघडण्यात येणाऱ्या आस्थापनाबाबत आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, बेकरी, मिठाई विक्रेते, सर्व प्रकारचे अन्न विक्रते ( चिकन, मटन, पोल्ट्री, अंडी आणि मासे ), पाळीव प्राणी खाद्य विकते, पावसाळी हंगाम पूर्व साहित्य विक्रेते, यांची दुकाने आस्थापना पुढील आदेशापर्यंत दैनंदिन सकाळी १० ते रात्री आठ या वेळे प्रमाणे चालु करण्यास परवानगी राहील. सदर कालावधीत दुध विक्री केंद्र विक्रेते यांना दैनंदिन सकाळी सात रात्री आठ वाजेपर्यत उघडण्यास परवानगी असेल, कुरीअर सेवा या दैनंदिन चालू राहतील. कृषी संबंधित सर्व दुकाने सकाळी १० रात्री आठपर्यंत चालू राहतील.

हेही वाचा - नवविवाहितेच्या तक्रारीवरून डॉक्टर पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

खानावळ रेस्टॉरंट यांना कोरोना नियमांचे पालन करत ग्राहकांच्या ५० टक्के उपस्थितीच्या मर्यादेत पुढील आदेशापर्यंत दैनदिन सकाळी १० ते रात्री १० या वेळेत उघडण्यास परवानगी राहील. कार्यालयीन उपस्थिती शंभर टक्के लग्न समारंभ या कालावधीत आयोजित करण्यात आले. लग्न सोहळे शक्यतो नोंदणी पद्धतीने पार पाडावेत. जर पारंपारिक पद्धतीने लग्न आयोजित करावयाचे असल्यास वर- वधू मिळून केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात यावे. अंत्यसंस्कारासाठी केवळ २० नागरिकांना परवानगी असेल.

सार्वजनिक प्रवासी वाहतूक शासन निर्देशाप्रमाणे पूर्णक्षमतेने वाहतूक करण्यास परवानगी असेल तसेच सर्व प्रवाश्यांनी मास्क या वापर करणे बंधनकारक असेल. बँका नियमित वेळा पत्रकानुसार सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

येथे क्लिक करा - आंबेडकरांची नाराजी भोवली; जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा

जिल्ह्यातील सर्व प्रकार उद्योग सुरु ठेवणे व्यायामशाळा, केशकर्तनालय आणि ब्यूटी पार्लर यांना केवळ ४० ग्राहकांच्या क्षमतेने दुकाने उघडण्यास परवानगी, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील देण्यात आली आहे. केवळ अशांनाच सद्यस्थितीत परवानगी राहतील. सदरचा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहील सदर आदेशातील सूचनांचे सर्व नागरिकांनी तसेच संबंधितांनी पालन करावे. तसेच आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची असणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT