file photo
file photo 
मराठवाडा

विनाकारण फिरणाऱ्या १२३ जणांवर कारवाई

गणेश पांडे

परभणी: कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासन पूर्ण शक्तीनिशी सामना करत आहे. परंतू, या दरम्यान लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लघन करणाऱ्या जिल्ह्यातील १२३ व्यक्तीवर ५३ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण फिरणारे १७६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यापासून शहरात संचारबंदी सूरू आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आहे. सुरुवातीला ता. ३१ मार्चपर्यंत हे आदेश होते. नंतर केंद्र शासनाने २१ दिवसांचा लॉकडाउन घेतल्याने ता. १४ एप्रिलपर्यंत हा कालावधी वाढविण्यात आला आहे. कोरोना विषाणु साथरोग संदर्भाने जिल्हयामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परभणी जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना स्वताच्या घरातच राहण्याच बाबत जनजागृती करण्यात येवून सोशल मिडियाच्या माध्यमातून या बाबत प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. परभणी जिल्ह्याच्या सीमेवर ८ नाकाबंदी पॉईंट सुरु करण्यात आले आहेत. कोणत्याही वाहनांना जिल्हा हद्दीत व जिल्हा हद्दी बाहेर परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. राज्यातील व परराज्यातील स्थलांतरीत लोकांना व त्यांच्या वाहनांना ताब्यात घेवून रिलीफ कॅम्प मध्ये त्यांची सोय करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खरेदी विक्रीची ठिकाणे भाजी मंडई, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून योग्य त्या उपयायोजना केल्या जात असून महत्वाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जिल्हा हद्दीत सतत सतर्क पेट्रोलिंग सुरु आहे.

१२३ जणांवर ५३ गुन्हे
कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागू असून ता. २१ मार्च रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या १४ आरोपींवर ९ गुन्हे दाखल केले आहेत. अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकूण ५३ गुन्हे दाखल असून १२३ आरोपींवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकल, रिक्षा व चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून १७६ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

७ कॅम्पमध्ये २२९ व्यक्तींचा समावेश
जिल्ह्यामध्ये एकूण सात ठिकाणी रिलीफ कॅम्प चालू असून त्यामध्ये परप्रांतिय व राज्यातील स्थलांतरीत कामगार व गरजुंना ठेवले असून त्यात १४० पुरुष, ३० महिला, ५९ मुले असे एकूण २२९ स्थलांतरीतांचा समावेश आहे. त्यांना या रिलीफ कॅम्प मध्येच राहण्याची व जेवणाची सोय स्वयंसेवी संस्था मार्फत करण्यात आली आहे.


प्रशासनाला कळवावे
पुणे, मुंबई अश्या मोठ्या शहरातून ज्यांनी स्थलांतर केलेले आहे. प्रवास केला आहे. तसेच तबलीकी जमातीच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वताहून प्रशासनाला कळवावे.

- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT