Right Side Signal Will Be Closed Near Milk Dairy in  Aurangabad
Right Side Signal Will Be Closed Near Milk Dairy in Aurangabad  
मराठवाडा

औरंगाबादमधील वाहतुकीत मोठा बदल, या ठिकाणचे सिग्नल बंद

मनोज साखरे

औरंगाबाद - जालना रस्त्यावर सायंकाळी अफाट गर्दीमुळे होणाऱ्या कोंडीवर तोडगा म्हणून पोलिसांनी एक प्रयोग सुरू केला आहे. दर्ग्याकडे जायचे असल्यास क्रांती चौकातून दूधडेअरीजवळील चौक पार करून मोंढा नाका उड्डाणपुलाखालून वळसा घालून दर्ग्याकडे जावे लागणार आहे.

मोंढानाकाकडून येणाऱ्या वाहनांना खोकडपुरात जायचे असल्यास क्रांती चौक
उड्डाणपुलाखालून वळसा घ्यावा लागणार आहे. आता हा प्रयोग उपयुक्त ठरतो का ते पाहावे लागणार आहे. 

शहरातील वाहतूक समस्या जटिल बनत असताना पोलिस प्रशासनाकडून एक उपाय जालना रस्त्यावरील दूधडेअरीजवळील चौकात करण्यात आला. हा चौक सायंकाळी सहा ते आठ या वेळात रहदारीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चौकातून विरुद्ध बाजूस जाताना आता यूटर्न घ्यावे लागणार आहे. अर्थात जालना रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा नको
व वाहनधारकांना सिग्नलवर वेटिंग करायची वेळ येऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे. 

काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दूधडेअरीजवळील चौकात पाहणी केली होती. सिग्नल संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने क्रांती चौकाकडून आलेल्या वाहनांना काल्डा कॉर्नरकडे जायचे असल्यास मोंढानाका उड्डाणपुलाखालून यूटर्न घेऊन परत यावे लागेल. मोंढा नाक्‍याकडून आलेल्या वाहनांना खोकडपुऱ्याकडे जायचे
असल्यास क्रांती चौकातून यूटर्न घेऊन यावे लागेल, असे निर्देश एका अधिसूचनेद्वारे पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 
 
अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांना सूट 

रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस वाहने आदी अत्यावश्‍यक सेवांना पोलिसांची अधिसूचना लागू राहणार नाही असे वाहतूक अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे. 

क्रांती चौक ते सिल्लेखाना 

जालना रस्त्यावरून शहरात येण्या-जाण्यासाठी या मार्गावरून वाहनधारक मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र, क्रांती चौक आणि सिल्लेखाना चौक वाहनधारकांबरोबर पादचाऱ्यांसाठीही धोकादायक बनला आहे. सततच्या वर्दळीमुळे या दोन्ही चौकांत दिवसातून एकतरी किरकोळ अपघात होतो. दोन्ही ठिकाणी सिग्नल आहे. मात्र, वाहनधारकांच्या सिग्नल तोडण्याच्या
मानसिकतेमुळेच हा चौक डेंजर बनला आहे. क्रांती चौकात वाहतूक पोलिसांनाही हे वाहनधारक जुमानत नाहीत. दुसरीकडे सिल्लेखाना चौकात तर सिग्नल केवळ नावालाच आहेत.  
 

पैठण गेट ते गुलमंडी 

शहरातील प्रमुख बाजारपेठ पैठण गेट ते गुलमंडी या मार्गावर आहे. मात्र, पैठण गेट येथे सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांची गर्दी होते. इथे पार्किंगची सुविधा नसल्यामुळे दोन्ही चौकांत अपघात होतात. मुळात या रस्त्यावर हॉकर्स असल्यामुळे रस्ता जॅम होतो. पादचाऱ्यांना तर या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागते. सण-उत्सवांच्या काळात या मार्गावरून मेगा ब्लॉकप्रमाणे गर्दी असते. या दोन्ही चौकांत वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलिसांचा बंदोबस्त लावावा लागतो. पैठण गेटजवळ उत्सवाच्या काळात पार्किंग बनवावी लागण्याची शक्‍यता आहे. इथे येणारी वाहने सुसाट येत असल्यामुळे अपघात होतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT