river Increase height bridge Demand sakal
मराठवाडा

Walur : दुधना नदीपात्रावरील पुलाची उंची वाढवा

दबाव गटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

सकाळ डिजिटल टीम

वालूर : वालूर-सेलू रस्त्यावरील राजेवाडी गावाजवळील दुधना नदीपात्रावर असलेल्या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी दबाव गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाचा आशय असा तालुक्यात लोकसंख्येने सर्वात मोठे तसेच उपबाजारपेठ असलेल्या वालूर परिसरातील जवळपास १५ ते २० गावांतील नागरिकांचा रोज संपर्क येतो.

वालूर-राजेवाडी-सेलू हा दळवळणाचा तालुक्यातील मुख्य रस्ता आहे. वालूरहून पुढे जिंतूर-परभणी रस्त्यावरील बोरी व जिंतूर-मंठा या राष्ट्रीय महामार्गावरील चारठाणा या मोठ्या गावांना जोडल्या जातो. वालूर परिसरात नुकतेच तुळजाभवानी या साखर कारखान्याचा प्रारंभ झाला आहे. सेलू-वालूर-पाचलेगाव-जिंतूर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे मोठे काम सुरू आहे.

सेलू-वालूरदरम्यान राजेवाडी गावाजवळील दुधना नदीपात्रावर कमी उंचीचा पूल असल्याने या पुलावरून नेहमीच पुराचे पाणी जात असल्यामुळे दोन-दोन, तीन-तीन दिवस वाहतूक ठप्प होत आहे. विशेषतः पावसाळ्यात नेहमीच या पुलावरून पुराचे पाणी तसेच लोअर दुधनाचे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने हा रस्ता बंद होत आहे.

त्यामुळे पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी होत आहे. निवेदनावर ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, ॲड. योगेश सूर्यवंशी, ॲड. देवराव दळवे, दिलीप मगर, सतीश काकडे, मुकुंद टेकाळे, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र आघाव, रोफ भाई, रामचंद्र कांबळे, दत्तराव कांगणे, चंद्रकांत चौधरी, अजित मंडलिक, राजेंद्र केवारे, विजय मंत्री, ॲड. उमेश काष्टे, किरण डुघ्रेकर, दिलीप शेवाळे आदींच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT