मराठवाडा

सोयगाव-बनोटी मार्गावरील वाहतूक ठप्प 

सकाळ वृत्तसेवा

सोयगाव (जि. औरंगाबाद)  : सोयगावसह तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 20) दुपारी सलग तिसऱ्या दिवशीही बहुलखेडा-तिडका पट्ट्यात मुसळधार झाला. त्यामुळे सोयगाव-बनोटी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. घोसला गावाजवळील नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने एसटी बस बराच वेळ अडकून पडली. या बसमध्ये 15 प्रवासी होते. 

गुरुवारी आलेल्या पुरामुळे ठप्प झालेली वाहतूक पहाटे पूर्ववत झाली असताना शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा पूर आला, यामुळे या भागाचा संपर्क तुटला होता. 

बहुलखेडा येथील बहुला नदीचे पात्र अठरा तासांपासून दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने या नदीपात्राने धोक्‍याची पातळी ओलांडली. घोसला गावाजवळील नदीला मोठा पूर आल्याने या पुराच्या पाण्यात 15 प्रवाशांची बस अडकली. 

पुराचे पाणी शेतात 
बहुलखेडा, घोसला, कवली, जरंडी भागातील शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांना याचा फटका बसला आहे. या पुराच्या पाण्यात या चार गावांतील तब्बल 500 हेक्‍टरवरील पिके बुडाली आहेत. 
सोयगाव परिसरात झालेल्या पावसाने सायंकाळी नाल्यांमधून पाणी वाहिले. त्यामुळे सोयगाव तालुक्‍याचा काही भाग सलग तिसऱ्या दिवशीही पुराने व्यापला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT