Hingoli Crime News sakal
मराठवाडा

Hingoli Crime News : हिंगोलीत व्यापाऱ्याचे साडेबारा लाख लुटले

हिंगोली येथील व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग घेऊन तिघांनी पळ काढल्याची घटना शहरात मंगळवारी (ता.१९) रात्री घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : येथील व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवून पैशाची बॅग घेऊन तिघांनी पळ काढल्याची घटना शहरात मंगळवारी (ता.१९) रात्री घडली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील भाजीमंडई येथे एनटीसी येथे राहणारे जर्दा, सिगारेट, सुपारी यांची होलसेल व किरकोळ विक्रेते आनंद हरिप्रसाद अग्रवाल यांचे अग्रवाल जर्दा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी त्यांनी १२ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन दुकानातील नोकर सुनील सरकटेसोबत रात्री १० वाजता दुचाकीने अग्रसेन चौकमार्गे आशा सायकल स्टोअर्स दुकानाकडे घरी निघाले.

त्यांच्या पाठीमागून एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्या तिघांनी अग्रवाल व नोकराच्या डोळ्यात चटणी टाकले. चाकूचा धाक दाखवीत १२ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली पैशाची बॅग ओढून दुचाकीवरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी आनंद अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT