file photo
file photo 
मराठवाडा

वृद्ध पेन्शनधारकास हातचालाखीने लुटले

सकाळ वृत्तसेवा

सेलू (जि.परभणी) : शहरातील जवाहर रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत शनिवारी (ता. ३०) दुपारी बारा वाजता पेन्शन काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त वृद्ध पेन्शनधारकास एका अनोळखी व्यक्तीने हातचालाखीने बारा हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. घटनेची नोंद सेलू पोलिस ठाण्यात झाली अाहे.

सेलू शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाची जवाहर रस्त्यावर दुसरी शाखा आहे. या शाखेत विविध कार्यालयांतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बँकखाते आहेत. यापैकी आरोग्य विभागात सेवा केलेले सेवानिवृत्त झालेले कर्मचारी वसंत विश्वनाथ चिटणीस (वय ८०) यांचे खाते या बँकेत आहे. शनिवारी ते आपल्या मुलासह बँकेत पेन्शनची रक्कम उचलण्यासाठी बँकेत गेले. त्यांनी त्यांच्या बचत खात्यातून सत्तेचाळीस हजार रुपये काढले. त्यांच्या मुलाने सदरील रोखपालाने दिलेली सत्तेचाळीस हजारांची रक्कम एकूण पाचशेच्या ९४ नोटा मोजून परत आपल्या वडिलांकडे दिली. त्याच वेळी मुलगा एका व्यक्तीसोबत संभाषण करत असताना बँकेत रांगेत उभा असलेला एक अनोळखी व्यक्तीने वसंत चिटणीस यांच्याजवळ येऊन, या पैशामध्ये खराब व नकली नोटा असू शकतात. त्या तपासून पाहा, असे म्हणाला. श्री. चिटणीस यांनी त्या अनोळखी व्यक्तीचे म्हणने ऐकत त्यास त्यांच्या जवळील नोटा तपासण्यासाठी दिल्या.

९४ नोटांपैकी २४ नोटा कमी भरल्या
 सदरील अनोळखी व्यक्तीने त्या नोटा मोजत असताना त्यामधील एक नोट वसंत चिटणीस यांना देऊन ही खराब नोट आहे बदलून घ्या, असे बोलून बँकेतून तो निघून गेला. ती नोट बदलून घेत परत एकदा नोटा मोजल्या. मात्र, त्यांच्या नोटा कमी भरत असल्याने त्यांनी नोटा परत मोजल्या असता त्यांना पाचशे रुपयांच्या ९४ नोटांपैकी २४ नोटा कमी भरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सदरील अनोळखी व्यक्तीने हातचालाखीने त्यांच्याकडील ९४ नोटा पैकी २४ नोटांना गंडा घातला आहे. असे एकूण ४७ हजारांपैकी बारा हजार त्या अनोळखी व्यक्तीने पसार केल्याने श्री. चिटणीस यांच्या लक्षात अाले. अापली फसवणूक झाली असल्याची तक्रार श्री. चिटणीस यांनी सेलू पोलिस ठाण्यात दाखल केली.


 

बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर...
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत, शहरातील बहुतांश पेन्शनधारकांची बचतखाते आहे. वृद्ध पेन्शनधारक बँकेत येऊन आपली पेन्शन उचलतात. मात्र, बँकेतून अशा वृद्ध पेन्शनधाराकांना गंडविल्या जात असल्याने बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर अाला आहे. बँकेत सुरक्षारक्षक असताना सुद्धा वृद्धांच्या फसवणुका होण्याचे हे प्रकार मागील अनेक वेळा झाले असले तरीही बॅंक प्रशासन मूग गिळून गप्प अाहे. या प्रकाराने पेन्शनधारात भीतीचे वातावरण निर्माण झाले अाहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT