Sharad-Pawar-Rohit-Pawar Sakal
मराठवाडा

Sharad Pawar: महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीसमोर झुकत नाही; रोहित पवारांचा स्पष्ट संदेश

सकाळ डिजिटल टीम

बीड- सह्याद्री कधी दिल्ली समोर झुकत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार बीडच्या सभेतून भूमिका स्पष्ट केली. शरद पवार साहेब ज्या विचारांसाठी लढतातहेत, शाहु-फुले आंबेडकरांचा, महाराष्ट्र धर्माचा विचार महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढा सुरु आहे. मला तरुणांना आवाहन करायचं आहे. पवार साहेब या वयातही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढत आहेत. तुम्हीही लढ्यात सामील व्हा, असं पवार म्हणाले. (rohit pawar said about sharad pawar and criticize bjp leaders in beed)

एका बाजूला सत्ता आहे, एका बाजूला विचार आहे. आम्ही सगळे विचारासोबत राहिलो आहोत. संघर्ष आम्हा सर्वांना करावा लागणार आहे. आपण मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात, भाजपविरोधात लढत आहोत. उद्या आमच्यावर कारवाई होईल. पण, आम्ही कोणालाही घाबरणार नाही असा शब्द देतो, असं पवार म्हणाले.

लहानपणापासून एकट गोष्ट ऐकलीये, जमजलीये आणि जपलीये म्हणजे महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीसमोर झुकत नाही. एकच विनंती आहे, पुढची लढाई मोठी आहे. पुढे पैसा आहे. घमंड आहे पण, आपल्याकडे लोकशक्ती आहे. पवार साहेब तालुका-तालुक्यात जात आहेत. आपल्याला शरद पवारांसोबत राहायचंय आणि येत्या काळात लोकांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणायचंय म्हणजे आणायचं, असा एल्गार त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज बीडच्या सभेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून राष्ट्रवादीचे नेचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, सक्षण सलगर इत्यादी नेते उपस्थित आहेत. संदीप क्षीरसागर यांनी बोलताना शरद पवार यांच्याबाबत समपर्कता व्यक्त केली.आयुष्यभर त्यांच्या पायापाशी राहीन असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT