Role of Dhananjay Munde in Maharashtra's politics  
मराठवाडा

धनंजय मुंडे काका-सोबत की पुतण्यासोबत....

दत्ता देशमुख
बीड - राज्यात झालेल्या राजकीय भूकंपात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. परंतु, काकांना आव्हान देऊन बंड करणारे धनंजय मुंडे व संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्यासोबत राहणार की अजित पवार यांच्यासोबत हे पाहावे लागणार आहे. वर्ष 2012 मध्ये धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात बंड पुकारत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वीही धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाच्या विषयाला शरद पवार अनुकूल नव्हते. अलीकडे मात्र शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिले आहे. तर, संदीप क्षीरसागर यांनीही काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान देत बंड पुकारले. दरम्यान, या निवडणुकीत हे बंडखोर दोन्ही पुतणे विजयी झालेले आहेत. परंतु, शनिवारी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही अजित पवार यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता काकांची एक आणि पुतण्याची एक आशा दोन भूमिका झाल्या आहेत. त्यामुळे बीडचे धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर हे दोन पुतणे काका शरद पवार यांच्या भूमिकेचे समर्थन करणार की पुतणे अजित पवार यांच्या भूमिकेचे हे पाहावे लागणार आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या... राज्याला अस्थिरतेमधून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक होत. ते काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, अशी प्रतिक्रिया राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत आज अनुक्रमे सकाळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान झाला असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग; सुप्रिया सुळेही सोबत, काय झाली चर्चा?

NEET वादावरून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही?; मोदी सरकारच्या भूमिकेची Inside Story... 8 प्रमुख कारणे

Live Updates Marathi : मनोज जरांगे यांनी घेतली अभिजीत दीपकेंची भेट

Monsoon Update : मॉन्सूनसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ! 'एल निनो'चे सर्वात धोकादायक रूप पाहायला मिळणार, दक्षिण भारतात दुष्काळसदृश्य परिस्थिती

निवृत्तीनंतर अरिजित सिंगचं मोठं कमबॅक! 'या' सिनेमासाठी पुन्हा धरला माईक, भावनिक नात्यासाठी पुनरागमन

SCROLL FOR NEXT