औरंगाबादमध्ये साकारलेले रोझ गार्डन.
औरंगाबादमध्ये साकारलेले रोझ गार्डन. 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये साकारले रोझ गार्डन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - पाणी टंचाई, कचरा, खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या शहरवासीयांना महापालिकेने स्वातंत्र्यदिनासाठी आनंदाची भेट दिली आहे. तब्बल बारा वर्षांपासून रखडलेले रोझ गार्डन गुरुवारी (ता. 15) खुले केले जाणार आहे. विशेष म्हणजे रोझ गार्डनमध्ये सुरवातीला कांही दिवस प्रवेशही मोफत राहणार आहे. 

मझनूहिल भागात रोझ गार्डन विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने 2007 मध्ये घेतला होता. तत्कालीन आयुक्त असीमकुमार गुप्त यांनी उटी महापालिकेने विकसित केलेल्या रोझ गार्डनच्या धर्तीवर शहरातही रोझ गार्डन विकसित करण्यासाठी नगरसेवकांना अभ्यास सहलीवर पाठविले होते. त्यानुसार निविदा प्रसिद्ध करण्यात आली; मात्र किती वर्षांसाठी रोझ गार्डन कंत्राटदाराला चालविण्यासाठी द्यायचे यावरून वाद निर्माण झाल्याने हे गार्डन विकसित होऊ शकले नाही.

दरम्यान, तत्कालीन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी रोझ गार्डनचा विषय पुन्हा एकदा हाती घेत केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून चार कोटींचा निधी मिळवून घेतला. श्री. कांबळे यांची बदली झाल्यानंतर पुन्हा काम रखडले. वर्षभरापूर्वी विद्यमान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी रोझ गार्डनसाठी तत्कालीन उपायुक्त वसंत निकम यांची निवड केली. श्री. निकम, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी अवघ्या काही महिन्यात रोझ गार्डन विकसित करीत याठिकाणी 18 प्रकारची गुलाबाची झाडे लावली आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वर्धापन दिनी आठ डिसेंबरला गार्डन खुले केले जाईल, असे आयुक्तांनी जाहीर केले होते; मात्र मुहूर्त हुकला. आता स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टपासून गार्डन खुले करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 
 
दोन कोटी 80 लाखांचा खर्च 

रखडलेल्या या रोझ गार्डनसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर असला तरी तो शासनाकडून मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेलादेखील तरतूद करावी लागली. गार्डनवर आतापर्यंत दोन कोटी 80 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यात पर्यटन विभाग व महापालिकेच्या 45 लाख रुपयांचा समावेश आहे. 15 ऑगस्टपासून सुरू होणारे रोझ गार्डन शहरवासीयांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT