Mahadev Jankar
Mahadev Jankar 
मराठवाडा

Mahadev Jankar Interview: 'मी लँडलॉर्ड, आता...'; बाहेरचा म्हणून हिणवणाऱ्या विरोधकांना जानकरांचे जोरदार प्रत्युत्तर

कार्तिक पुजारी

परभणी- लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये रासपचे महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यामध्ये थेट लढत आहे. महायुती आणि महाआघाडीमध्ये हा मुकाबला आहे. बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार असं म्हणत विरोधकांनी जानकरांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळचे प्रतिनिधी अमित उजागरे यांनी जानकर यांना बोलतं केलं आहे.

बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक उमेदवार?

एक राष्ट्रीय उमेदवार होत असताना देशपातळीवर कुठेही उभं राहावं लागतं. मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझ्या एबी फॉर्मवर माझीच स्वाक्षरी आहे. माझे मित्र माजी खासदार यांच्या एबीफॉर्मवर दुसऱ्याची सही आहे. राज्यातील कुठल्याही मतदारसंघातून मी उभे राहू शकतो. लीडर अँड लॅडर असे दोन प्रकार असतात. मी लीडर आहे. बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम बंगालमध्ये उभे राहिले होते. नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातून लढतात, असं जानकर म्हणाले.

संजय जाधव माझ्यावर टीका करतात, पण तेही इथले नाहीत. ते लातूरमधून आले आहेत. मी आता परभणीकर होणार आहे. परभणीमध्ये मी घरच घेणार आहे. दिल्ली-मुंबई-परभणी असा माझा प्रवास राहणार आहे. माझं व्हिजन विकासाचं आहे. पी. व्ही नरसिंह राव हे रामटेकमधून लढले. ते आंध्र प्रदेशचे होते. राष्ट्रीय नेते देशातील कोणत्याही जागेतून निवडणूक लढवू शकतात. मी राष्ट्रीय नेता आहे. मला एक जिल्हा किंवा तालुका पाहून चालणार नाही, असं ते म्हणाले.

परभणीसाठी काय आहे व्हिजन?

मला परभणींकरांनी विजयी केलं तर मी देशात टॉपला या मतदारसंघाला नेईन. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतात. त्याप्रमाणे जर्मनीची टेक्नॉलॉजी परभणीत आणली जाईल. सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करेन. शेती हब, कॉटन हब निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. मला आता पैशाची काही कमी नाही. मी लँडलॉर्ड आहे. माझा मोठा भाऊच पंतप्रधान आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या चौघांच्या पाया पडून मी परभणीचा मागासपणा दूर करण्याचा प्रयत्न करेन. विकसित परभणी निर्मिती करण्याचं माझं ध्येय आहे, असं जानकर म्हणाले.

काम करण्यासाठी पैसा लागतो. पैसा मिळवण्यासाठी सत्ता लागते. देशात आपलीच सत्ता येईल, राज्यात आपलीच सत्ता आहे. त्यामुळे परभणीतील पायाभूत सुविधा मजबूत करता येतील. रस्ते निर्मिती करु. एमआयडीसीमध्ये उद्योग आणू. पाणी देखील इथे आणण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करु. शेतीसंबंधी व्यवसाय करणाऱ्यांना सोयी देऊ. सध्या परभणीत खूप गोष्टी नाहीत. त्या सर्व गोष्टी आणण्याचा प्रयत्न माझा आहे, असं ते म्हणाले.

नरेंद्र मोदींचे छोटे भाऊ!

मोठ्या भावाच्या मनात काय आहे त्यांच्यावर सोडलं आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यायचं असेल तर देतील. माझा भाऊच पंतप्रधान असल्याने मला काळजी करायची गोष्ट नाही. थोरला भाऊ छोट्या भावाचा हट्ट पुरवत असतो. त्यामुळे मी मोठ्या भावाकडे हट्ट करेन, रडत बसेन. त्यांच्याकडील तिजोरीची चावी घेऊन त्यातील पैसे घेऊन परभणींकरांना वाटेल. मी खासदार म्हणून संसदेत जाईल. मला संसदेत बोलता येईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत राहीन, असं जानकर म्हणाले.

किती मताधिक्य मिळेल?

माझ्यावर सर्व पक्षातील लोकांचे आशीर्वाद आहेत. सर्वजण माझ्यासाठी सभा घेत आहेत. माझ्या विजयाची मला खात्री आहे. मला वाटतं जे मतदान होईल त्यातील ९० टक्के मतदान होईल आणि १० टक्के मतदान संजय जाधव यांना होईल. मराठा समाजाचे मतं मला ४० ते ५० टक्के मिळतील. मराठा समाज बहुजनांचा मोठा भाऊ आहे. मराठ्यांचे मत मलाच मिळणार आहे. मुस्लीम, दलित सर्वजण माझ्यासोबत येतील. मी सर्वांना जवळचा वाटतो. हात दाखवला की मी गाडी थांबवतो. मी मोठा-छोटा पाहत नाही, असं महादेव जानकर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT