RTO-Maharashtra
RTO-Maharashtra 
मराठवाडा

आरटीओने केले कारवाईचे नाटक

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - दिवाळीतील गर्दीच्या अनुषंगाने ट्रॅव्हल्स बस कंपन्यांनी लूट सुरू केली. या प्रकरणाला ‘सकाळ’ने वाचा फोडताच खडबडून जागे झालेल्या आरटीओ कार्यालयाने धडक कारवाईला सुरवात केली. मात्र, अवघ्या चार बसवर कारवाई करून अधिकाऱ्यांनी कारवाईकडे पाठ फिरवल्याने प्रवाशांची लूट मात्र थांबू शकली नाही. 

दिवाळीनिमित्त ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तब्बल दुप्पट ते तिप्पट भाडेवाढ केली. नियमाप्रमाणे एसटी भाड्यापेक्षा दीडपट अधिक भाडे ट्रॅव्हल्सचालकांना घेण्याची मुभा काही दिवसांपूर्वी परिवहन विभागाने दिलेली आहे. असे असताना ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रवाशांची लूट करीत आहेत. याविरोधात ‘सकाळ’ने ‘प्रवाशांना लुटण्याचा फंडा’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करताच प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी अधिक भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश भरारी पथकांना दिले होते. त्यानुसार एक ते तीन नोव्हेंबरदरम्यान आरटीओ कार्यालयाच्या दोन भरारी पथकांनी मोहिमेत एकूण अकरा बसगाड्यांची तपासणी केली व अधिक भाडे घेणाऱ्या चार खासगी बस जप्त केल्या. या कारवाईनंतर मात्र अधिकारी दिवाळीमध्ये रममान झाले. त्यामुळे कारवाईचा केवळ देखावा करण्यात आल्याचे चित्र आहे. 

दिवाळीत आणि अजूनही प्रवाशांची प्रचंड लूट सुरू आहे. तरीही आरटीओ कार्यालयाने ट्रॅव्हल्सधारकांची लूट रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले नाहीत. उलट थातूरमातूर कारवाई करून दिवाळी साजरी करण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.

तक्रारीची झिकझिक 
जास्तीचे भाडे आकारणी केल्यास नागरिकांनी/प्रवाशांनी (टोल फ्री क्रमांक ः ०२२-६२४२६६६६) यावर तक्रार करावी, असे आवाहन केले होते. या राज्यव्यापी क्रमांकावर रोज साधारण तीन ते चार तक्रारी येत असून, गेल्या अकरा दिवसांत साधारण पन्नास तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुळात टोल फ्री क्रमांक हा ऑनलाइन संगणकीय सिस्टिम असल्याने क्रमांकावर तक्रार करताना प्रवाशाला एक दाबा, दोन दाबा अशा पद्धतीने सामोरे जावे लागते. त्यामुळे कुणी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही. तक्रारीसाठी क्रमांक देऊन तक्रारी येणार नाहीत अशाच पद्धतीचा अवलंब परिवहन विभागाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT