Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसोबत साथ फाउंडेशनची दिवाळी

दिवाळीनिमित्त आनंद देण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न सुरू

सकाळ वृत्तसेवा

दिवाळीनिमित्त आनंद देण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न सुरू

हिंगोली : येथील सेवासदन वसतिगृहात साथ फाउंडेशन संस्थेच्या वतीने यावर्षीची दिवाळी अतिवृष्टीग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासह सैनिक आणि दिव्यांग कुटुंबीयांसोबत शनिवारी साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, डॉ. मनसा कलासागर, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, एपीआय शिवसांब घेवारे, शिवाजी कऱ्हाळे, श्री. वाघमारे, धनराज कदम, मीरा कदम, सेवा सदनमधील मुले तसेच विविध कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कुटुंबातील महिलांना साडीचोळी तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. साथ फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज कदम आणि मीरा कदम हे मागील दहा वर्षांपासून असा उपक्रम राबवत आहेत.

ज्या घरामध्ये दिवाळी साजरी होत नाही त्या घरामध्ये दिवाळीनिमित्त आनंद देण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न सुरू असतो. या कार्यक्रमासाठी किशोर तळेकर, सृष्टी कयाल, डॉ. कंदी कैलास साबू, प्रफुल्ल बोराळकर, डॉ. मनोज साबू, प्रवीण महाजन, प्रभू आप्पा जिरवणकर, गोपाल सोमानी, भास्करराव मोरे, कैलास साबू, जितू जैन, जीवन काबरा, ज्योती वाघमारे, राजश्री क्षीरसागर आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना १० वर्षांनी दिलासा, ग्रंथालय कंत्राट प्रकरणी विशेष न्यायालयाकडून दोषमुक्त

Maharashtra Rain Alert : गणरायाच्या निरोपाला पाऊस हजेरी लावणार ! २१ जिल्ह्यांना यलो-ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Maharashtra Ganesh Visarjan Live: लालबागच्या राजाला निरोप देण्याची तयारी; भव्य विसर्जन मिरवणुकीला लवकरच सुरुवात

Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

SCROLL FOR NEXT