Aurangabad news  
मराठवाडा

साडेसाती काळात काय राहील तीन राशींचे राशीफल

सकाळ डिजिटल टीम

पौष अमावास्या, म्हणजेच शुक्रवारी (ता. २४) सकाळी ९ वाजून ५३ मिनिटांनी शनि मकर राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीची साडेसाती संपून या दिवसापासून कुंभ राशीला साडेसाती चालू होत आहे. धनु, मकर आणि कुंभ राशींना साडेसाती राहणार आहे. याबद्दल वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत लक्ष्मणराव पांडव यांनी तीन्ही राशींचे फलित सांगितले. ते eSakal.com च्या वाचकांसाठी... 

धनू 

आर्थिक वृद्धी होईल. आपण मुळातच एक उत्तम सल्लागार आहात. विद्वान आहात व सात्विक वृत्ती आहे. साडेसातीमुळे २०१८ - १९ ही वर्षं पूर्णपणे खराब गेली. प्रत्येक कामात अडथळे व अपयश आले. परंतु आता मात्र तसे होणार नाही.

या वर्षात आर्थिक वृद्धी होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच बराचसा ओढा अध्यात्माकडे राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत. नोकरी/व्यवसायात वृद्धी होईल. नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात येतील व त्यात यशही मिळेल. 

मकर 

साडेसाती असल्याने अखंड सावधान राहावे. आपला स्वभाव धीरगंभीर, भावनाप्रधान, शिस्तप्रिय आहे. लोकांचे आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. त्यातच साडेसातीमुळे मानसिक क्लेश खूप संभवतात. कमालीचा एकांतवास जाणवेल.

त्यामुळे आपणच शांतता, संयम ठेवावा. जिभेवर पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. लेखक असाल, तर एखादी सुंदर कलाकृती आपल्याकडून लिहिली जाईल. पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे. कायदा मोडू नका, नाही तर अटक होण्याचे योग आहेत.

कुंभ

आपल्या साडेसातीला सुरवात होत आहे. लग्नेशाचे व्ययस्थानातून भ्रमण होत आहे. त्यामुळे कोणतेही कारण नसताना आपणाकडून नुकसान होऊ शकते. वास्तविक आपल्याला हुशारीपणा व धूर्तपणा हे गुण मुळातच मिळाले आहेत. त्यामुळे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्या.

नोकरी, व्यवसायात दीर्घकालीन एखादी अडचण उभी राहू शकते. आरोग्याची काळजी घ्या. डॉक्टरांना निदान होण्यास अडचणी निर्माण होतील. विवाह ठरविताना काळजी घेणे आवश्यक. तसेच आपली फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

वरील तिन्ही राशींना साडेसातीनुसार राशीप्रमाणे मिळणारे फलित मांडण्यात आलेले आहे. पण प्रत्येकाच्या जन्मकुंडलीनुसार गोचरीचा शनि ज्या स्थानामधून भ्रमण करत असेल, त्याप्रमाणे फळदेखील बदलू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

Marathi Cinema : शरद गोरे यांच्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभर डंका

SCROLL FOR NEXT