Partur Jalna News 
मराठवाडा

खळबळजनक : मोदींची सेफ रूम होती सुपारीबहाद्दराच्या जागेत!

योगेश बरीदे

परतूर : परतूर येथील व्यापारी राजेश नहार याने दोन जणांच्या सुपाऱ्या दिल्याचे पोलिस तपासामध्ये उघड झाले आहे. याच राजेश नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये निवडणूक प्रचारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेफ रूम उभारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जालना शहरातील व्यापारी विमलराज सिंघवी व बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने परतूर येथील व्यापारी राजेश नहार याला अटक केली आहे. सध्या गौतम मुनोत सुपारी प्रकरणी राजेश नहार हा पोलिस कोठडीत आहे. परतूर रेल्वेस्टेशन परिसरातील महावीर पेट्रोल पंपावर 2007 मध्ये मोठी दुर्घटना झाली होती. यात चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळीही राजेश नहार याला चौकशीला सामोरे जावे लागले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी 16 ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी परतूर येथे आले होते. ही सभा राजेश नहारच्या जिनिंगपासून हाकेच्या अंतरावर होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नहार याच्या अक्षय कॉटेज या जिनिंगमध्ये पंतप्रधानांसाठी सेफ रूम तयार केली होती. अर्थात, नरेंद्र मोदी या सेफ रुमकडे गेले नसले, तरी आता राजेश नहार याचे कारनामे उघड झाल्यामुळे ही सेफ रूम प्रकरण चर्चिले जाऊ लागले आहे. 

पोलिसांना माहिती नव्हते का? 

पोलिसांनी प्रोटोकॉलच्या अनुषंगाने बनवलेल्या इथल्या सेफ रूममध्ये पंतप्रधान मोदी आलेच नाहीत, हा भाग वेगळा. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी उभारली जाणारी सेफ रूम आपण गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या संशयित सुपारीबहाद्दर माणसाच्या जागेत उभारत आहोत, याची पोलिसांना पूर्वकल्पना नव्हती का? पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेफ रूम तयार करताना जागामालकाच्या पार्श्‍वभूमीची तपासणी केली नव्हती का, अशा प्रश्‍नांना आता उधाण आले आहे. 

कोण आहे हा राजेश नहार? 

कौटुंबिक पार्श्‍वभूमी सामान्य असलेल्या व्यावसायिक राजेश नहार याची आर्थिक परिस्थिती 2006 पर्यंत फारशी ठीक नव्हती. आर्थिक अडचणीमुळे काही काळ त्याला परतूर सोडावे लागले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातील काही राजकीय लोकांचा सहारा घेत नहार याने रिअल इस्टेटच्या व्यवसायाला सुरवात केली. 2017 मध्ये परतूर शहरात अक्षय कॉटेज नावाने जिनिंग सुरू करत त्याने व्यवसायात झेप घेतली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्‍टोबरला परतूर येथे सभेसाठी आले होते. ज्या ठिकाणी त्यांची सभा होती, त्या ठिकाणाच्या जवळ त्यांची सेफ रूम करणे गरजेचे होते. यामुळे राजेश नहार याची जिनिंग आणि परिसर पोलिस प्रशासनाने तीन दिवस पूर्णपणे ताब्यात घेतला होता. या सर्व गोष्टींची माहिती वरिष्ठांना होती. 
- शिरीष हुंबे, पोलिस निरीक्षक, परतूर. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup:'...तरच अभिषेक शर्माला फलंदाज समजेल', IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानी गोलंदाजाचं चॅलेंज

VIDEO : कोल्हापुरात 'व्हॅलेंटाईन डे'ला अघोरी कृत्य; हळद-कुंकू लावून झाडाला तरुणीचा फोटो अन् काळी बाहुली खिळ्याने ठोकली, भानामती की बदनामीचा कट?

Malegaon News : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार?; संचालक मंडळाची एकमुखी सहमती

Latest Marathi News Live Update : पुढील तीन ते चार दिवस शरद पवार घरीच आराम करणार; सुप्रिया सुळे यांची माहिती

गाडीतून उतर, लायसन दे! महिला पोलिसाने अडवलं, कॅब चालकाशी घातला वाद; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT