राजन गवस sakal
मराठवाडा

शुद्धलेखनाच्या आग्रहामुळे गावागावांतील मुलांच्या पिढ्या बरबाद झाल्या'; साहित्यिक राजन गवस

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी

सकाळ वृत्तसेवा

उदगीर : ‘‘शुद्धलेखनाच्या आग्रहामुळे गावांगावातील मुलांच्या पिढ्या अक्षरशः बरबाद झाल्या. आपली बोली अशुद्ध आहे असा समज होऊन त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला, परिणामी त्यांचा आत्मविश्वास कमी झाला. या आग्रहामुळे मुलांचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी परखड टीका प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी केली. उदगीर येथील ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात छत्रपती शाहू महाराज सभागृहात डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर ही मुलाखत पार पडली. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी गवस यांच्याशी संवाद साधला.

गवस म्हणाले, ‘‘शुद्धलेखनाऐवजी प्रमाण भाषा लेखन नियम असा शब्द वापरणे शक्य होते. मात्र काहींच्या अंतस्थ हेतूंमुळे शुद्धलेखन हा शब्द अनेक वर्षे प्रयत्न करूनही हटवता आला नाही. भाषाशास्त्राच्या नियमानुसार कोणतीही भाषा अशुद्ध नाही, मग हा शुद्धलेखनाचा आग्रह का धरण्यात आला? गावांगावातील मुलांचे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य शुद्धलेखन या एका शब्दाने हिरावून घेतले.’’

या आग्रहाने गावागावांतील, खेडोपाड्यातील मुलांचे जबर नुकसान झाल्याची टीकाही गवस यांनी केली. "गावातला मुलगा शाळेत येतो, त्याच्या बोली भाषेत लिहू लागतो, तेव्हा शिक्षक म्हणतात हे अशुद्ध आहे, शुद्ध लिही. मग त्या मुलाच्या मनावर आपली, आपल्या कुटुंबाची बोली भाषा अशुद्धच आहे, हे बिंबवले जाते. मग तो बोलण्यास बिचकू लागतो. एक शब्द जरी चुकला तरी अशुद्ध म्हणून हिणवले जाण्याची त्याला भीती वाटते. त्यामुळे जाहीरपणे बोलायला ते घाबरू लागतात, त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. परिणामी ते व्यक्तच होत नाही. वर्षोनुवर्षे हे होत आहे. आता तरी हे बदलायला हवे. महामंडळानेच याबाबत ठराव करून शुद्धलेखन हा शब्द बाद करण्याचा नियम करावा", असे गवस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune LPG Shortage : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! एलपीजी सिलिंडर घरपोच मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, नागरिकांच्या रांगा झाल्या कमी

माजी सरन्यायाधीश राज्यसभेतून निवृत्त, ६ वर्षात एकही प्रश्न विचारला नाही, चर्चेत एकदाच सहभाग त्यातही वादग्रस्त विधान

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar News: बारवेलगत अतिक्रमणाचा डाव उधळला; महापालिकेची कारवाई; समर्थनगरमध्ये पत्र्याचे शेड हटविले

Sambhajinagar Hospital News: घाटीवरील ताण कमी होणार; १८९ कोटींचे माता-बाल रुग्णालय लवकरच सुरू; दूध डेअरी परिसरात अत्याधुनिक महिला रुग्णालय

SCROLL FOR NEXT