परभणीत साईभक्तांचे साई जागर आंदोलन  
मराठवाडा

Video : परभणीत साईभक्तांचे साई जागर आंदोलन  

गणेश पांडे

परभणी : काही दिवसापासून शिर्डी संस्थान व पाथरी येथील साई जन्म संस्थान यांच्यात वाद सुरू झाला आहे. राज्य शासनाने पाथरीच्या संस्थानला शंभर कोटी रुपयांचा निधी देऊ केल्यानंतर हा वाद सुरू झालाय. परंतू, शिर्डी संस्थान किंवा शिर्डीकरांनी पाथरी संस्थानच्या विकासात अडथळा आणू नये, यासाठी परभणीतील साईभक्त एकवटले आहेत. शिर्डीकरांना साई जन्मभूमीबाबत सदबुद्धी द्यावी, यासाठी परभणीत साईभक्तांनी रविवारी (ता.१९) साईजागर आंदोलन करून प्रशासन दरबारी आपले म्हणणे मांडले आहे.

पाथरी येथे श्री साईबाबांचे जन्मस्थान आहे. याठिकाणी अनेक पुरातन वस्तू या संस्थांनी जतन करून ठेवले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या संस्थानात साईबाबांची मनोभावे पूजा करून उत्सव साजरे केले जात आहेत. साईबाबांच्या जन्मस्थानाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातच नव्हे तर परराज्यातूनही हजारो साईभक्त पाथरी येथे बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आपले सुखदुःख बाबांच्या चरणी सांगून आपले गाऱ्हाणे म्हणत असतात. साई जन्मस्थळाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्यानंतर राज्यात सत्ताबदल होऊन उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी जन्मस्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी केली होती. औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई जन्म संस्थान पाथरीला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. खरेतर या घोषणेनंतर वादाला सुरुवात झाली आहे. शिर्डीकरांनी उकरलेला हा वाद विनाकारण असल्याचा आरोप साईभक्तांनी केलाय. 

हेही वाचा - बाळाला जन्मतःच ‘का’ करावे लसीकरण : ते वाचलेच पाहिजे ​

शिर्डीकरांना सदबुद्धी यावी 
पाथरी येथे राज्य शासनाने दिलेल्या निधीतून अनेक विकास कामे केली जाणार आहेत. परंतू, याला विरोध होत असल्याने परभणी जिल्ह्यातील साईभक्त एकवटले आहेत. रविवारी (ता.१९) परभणी जिल्ह्यातील साईभक्तांनी शिर्डीकरांना सदबुद्धी यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साईजागर आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात परभणीचे खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांच्यासह साई जन्म संस्थान समितीचे सर्व पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

बॉसने प्रेग्नंसी लिव्ह नाकारली, नवजात बाळाचा मृत्यू, कंपनी देणार कोट्यवधींची नुकसान भरपाई

Latest Marathi News Live Update : अमरावतीतील दर्यापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय भारसाकडे यांचा युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT