sairat
sairat 
मराठवाडा

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली `सैराट`ची स्टोरी

हरी तुगावकर

लातूर : एका विद्यार्थ्याने दहावीच्या परिक्षेत चक्क `सैराट`ची पूर्ण कथा लिहून काढल्याचा प्रकार लातूर विभागीय मंडळात घडला आहे. तीन वर्षीपूर्वी प्रदर्शित झालेल्या `सैराट` चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तरुणांना तर त्याची अधिकच भूरळ पडली. आर्ची अन् परशा हेच सर्वत्र चर्चेत राहिले. त्याला विद्यार्थीही अपवाद ठरले नाहीत.

अनेकवेळा चित्रपट पाहिल्याने अनेकांना या चित्रपटाच्या कथानकासोबतच त्याचे संवादही पाठ झाले. या चित्रपटाचे कथानक उत्तरपत्रिकेत लिहावे की नाही, याचे भानही एका विद्यार्थ्याला राहिले नाही. खरे तर चित्रपटात काम करणाऱया आर्चीला दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाले होते, पण इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत आर्ची अन् परशाची कथा लिहिणाऱया या विद्यार्थ्याला गुणात मात्र `भूगोल` (शून्य) मिळाला आहे.

दहावीच्या परिक्षेचा निकाल शनिवारी (ता.८) जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष महेश करजगावकर यांनी या निकालाची माहिती दिली. त्यात त्यांनी हा घडलेला खरा प्रकार गमतीने सांगितला असला तरी दहावी असतानाच विद्यार्थ्यांच्या मनावर चित्रपट कशा पद्धतीने परिणाम करतो आहे, हे समोर येत आहे.

या विभागात दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात होत्या. इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत एका विद्यार्थ्याने हा प्रकार केला असल्याचे उत्तरपत्रिका तपासणी करणाऱया शिक्षकांच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार अध्यक्षांच्या लक्षात आणून दिला. या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत `सैराट`चे कथानकच लिहिले होते. त्याने यात आर्ची आणि परशा उभा केला होता. आठवतील तशी गाणी देखील त्याने उत्तरपत्रिकेत लिहून काढली होती. हा सर्व प्रकार पाहून उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांसोबत मंडळाचे अध्यक्ष देखील आवाक् झाले.

चित्रपटात काम करणारे आर्ची आणि परशा हे दोघेही आयुष्याच्या परीक्षेसोबतच दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगले  गुण मिळवून एक पाऊल पुढे टाकत आहेत, पण इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत आर्ची व परशाची `सैराट` स्टोरी लिहिणाऱया या विद्यार्थ्याला इतिहासाच्या पेपरला मात्र गुणांत मोठा `भूगोल` (शुन्य) मिळाला आहे. या विद्यार्थ्याने `सैराट`चा इतिहास लिहिण्यापेक्षा दहावीच्या इतिहासाची पाने चाळून तो लिहला असता, तर आयुष्यात तो पुढे गेला असता हे मात्र निश्चित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: निळवंडे कालव्याचं काम मोदींमुळे पूर्ण झालं - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT