file photo 
मराठवाडा

‘सकाळ’च्या बातमीची दखल : विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा

गणेश पांडे

परभणी : लातूर येथे अडकून पडलेले शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पालकांना पास देण्याचे घोषित केले आहे. ‘सकाळ’ने हा प्रकार बुधवारच्या (ता. सहा) अंकातून ‘विद्यार्थ्यांची अडचण समजून घेणार का? ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत करण्यात आले होते. याची दखल घेत प्रशासनाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे सांगत पालकांनी 'ई - पास'साठी अर्ज करावेत, असे आवाहन केले. त्यानुसार बुधवारी (ता. सहा) बहुतांश पालकांनी अर्ज सादर केले.

परभणी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी लातूर येथे शिक्षणासाठी राहतात. परंतु, देशात सुरवातीला २१ दिवसांची टाळेबंदी लागू झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी त्यांचे शैक्षणिक साहित्य तेथेच ठेवून परभणी जिल्ह्यात परत आले होते. परंतु, कालांतराने कोरोना विषाणू संसर्गामुळे देशातील टाळेबंदीचा कालावधी वाढत गेला आणि त्याच नीट व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोर पुस्तकाविना अभ्यास कसा करावयाचा, हा प्रश्न पडला होता. या संदर्भात ‘सकाळ’ने बुधवारी (ता.सहा) हा प्रकार समोर आणला. ‘विद्यार्थ्यांची अडचण समजून घेणार का? ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत होताच वृत्ताची दखल घेत जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करून या पालकांना लातूर येथे जाण्यासाठी पासेस देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या सर्व पालकांचा लातूर येथे जाऊन मुलांचे पुस्तके आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पालकांच्या रांगा
लातूर येथे जाण्यासाठी ई-पास देण्याचे प्रशासनाने कबुल केले आहे. त्यामुळे या पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी गुरुवारी पालकांनी जिल्हा रुग्णालयाच्या तपासणी केंद्रावर गर्दी केली होती.

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
लातूर येथे शिक्षणासाठी असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य लातूर येथे अडकले आहे. परीक्षा तोंडावर असल्याने सदरील शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याचे सांगून पालकांचे शिष्ठ मंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली असून पालकांना ई-पाससाठी अर्ज करण्याचे सांगितले आहे.
- स्वाती सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी, परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT