संभाजी निलंगेकर संभाजी निलंगेकर
मराठवाडा

'कोरोना व्यवस्थापन खर्चाची श्वेतपत्रिका काढा' आमदार निलंगेकरांची मागणी

गेल्या दीड वर्षात आलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकार्‍यांकडून खुली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

सकाळ वृत्तसेवा

गेल्या दीड वर्षात आलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकार्‍यांकडून खुली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

लातूर: गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गाची अनेकांना बाधा झालेली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी झालेले व्यवस्थापन व करण्यात आलेल्या उपाययोजना याकरीता केंद्र, राज्य व विविध सामाजिक संघटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून देण्यात आली होती. सदर निधी किती आला होता आणि तो किती खर्च झाला यासह जिल्हाभरात कोरोनाची लागण किती जणांना झाली व यामुळे किती मृत्यू झाले यासह कोरोना बाबतच्या विविध माहितींची श्वेतपत्रिका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी काढून त्याचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करावा. त्याचबरोबर यासंबंधी गेल्या दीड वर्षात आलेल्या विविध तक्रारींची जिल्हाधिकार्‍यांकडून खुली चौकशी करावी, अशी मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आला. सदर निधी खर्च करण्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी सर्वसामान्यांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळेच याबाबतची श्वेतपत्रिकाकाढून त्याचा लेखाजोखा सर्वसामान्य जनतेसमोर सादर केला पाहिजे. या श्वेतपत्रिकेमध्ये आजतागायत जिल्ह्यातील किती जणांना कोरोनाची बाधा झाली याची आकडेवारी देऊन त्यापैकी किती रुग्णांवर शासकीय रुग्णालयात तर किती रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले त्याचीही माहिती देण्यात यावी. त्याचबरोबर कोरोना व्यवस्थापनाबाबत जिल्ह्यातील किती आमदारांनी आपला किती रुपयाचा स्थानिक निधी उपलब्ध करून दिला याच्याही आकडेवारीचा समावेश असावा असे नमूद करुन जिल्ह्यातील किती कोरोनाबाधीत रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ प्राप्त झाला याची माहितीही देण्यात यावी.

विशेषतः कोरोनासह इतर आजारामुळेही किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे, अशी मागणी श्री. निलंगेकर यांनी या पत्रात केली आहे. कोरोनासाठी कोणकोणत्या औषधाचा किती साठा उपलब्ध झाला याबाबत विस्तृत माहिती देऊन रेमडेसिवर या इंजेक्शनची किती मागणी होती आणि

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपीवर सर्व सात गुन्हे सिद्ध झालेत- न्यायाधीश

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Malware Alert : लॅपटॉप-कॉम्प्युटरवर WhatsApp वापरताय? CERT-In ने दिला गंभीर इशारा, 'हा' मेसेज बघताच बँक अकाउंट होईल रिकामं

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Shaktipeeth Highway : अदानी-अंबानींसाठी सुपीक जमीन जाणार? 'शक्तिपीठ' महामार्गावरून सांगलीतील शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्हा परिषदेवर वाढला दबाव

SCROLL FOR NEXT