हिंगोली तहसीलदारावर एसीबीचा गुन्हा 
मराठवाडा

वाळू प्रकरण : हिंगोलीचा तहसीलदार माचेवाड यांच्यावर एसीबीचा गुन्हा

तहसीलदार यांना जावुन भेटले असता रेतीच्या पकडलेल्या पाचही टिप्परची लवकर कार्यवाही करुन सोडण्यासाठी व मागील महिन्याचे रेतीचे टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेले पैसे असे मिळुन तीन लाख रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती.

राजेश दार्वेकर

हिंगोली : येथील तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी पकडलेल्या वाळुच्या टिप्परवर कारवाई न करण्यासाठी तीन लाखाच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी मंगळवारी (ता. एक) गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, पिडीत तक्रारदार यांनी ता. २५ मे रोजी हिंगोली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. त्यांनी भाड्याने घेतलेले पाच टिप्पर मागील विस ते पंचविस दिवसापुर्वी रेतीची वाहतुक करीत असतांना हिंगोली पोलिसांनी पकडून पोलिस स्टेशनला लावुन तहसीलदार यांना पत्रक देवुन पुढील कार्यवाही करणेबाबत कळविले होते.

हेही वाचा - अदर पूनावालांचं देशासाठी मोठ योगदान

त्यावरुन तक्रारदार तहसीलदार यांना जावुन भेटले असता रेतीच्या पकडलेल्या पाचही टिप्परची लवकर कार्यवाही करुन सोडण्यासाठी व मागील महिन्याचे रेतीचे टिप्परवर कार्यवाही न करण्यासाठी राहिलेले पैसे असे मिळुन तीन लाख रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार दिली होती.

त्यावरुन ता २५ मे रोजी तक्रारदार यांचे तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी तक्रारदार यांना तीन लाखाची लाच स्विकारण्याची सहमती दिली. त्यावरुन लोकसेवक माचेवाड यांचेविरुध्द पोलिस ठाणे (शहर) मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाई सुरु आहे. यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ही कामगिरी नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक निलेश सुरडकर, तसेच विजय उपरे, तान्हाजी मुंढे, विनोद देशमुख, ज्ञानेश्वर पंचलिंगे, अविनाश किर्तनकार, प्रमोद थोरात, श्री सरनाईक यांचे मदतीने यशस्वीपणे केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT