परतूर : वाळू माफियांनी उलटवून टाकलेली जीप.  
मराठवाडा

वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्लाबोल 

योगेश बरिदे

परतूर (जि. जालना) -  तालुक्‍यातील सातोना येथे परतूर-सेलू मार्गावर मंगळवारी (ता. 17) रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास वाळू माफियांनी महसूल विभागाच्या पथकावर हल्लाबोल केला. यात जीव वाचवीत पथकातील कर्मचाऱ्यांनी तब्बल दहा किलोमीटर अंतर पळून काढले. या घटनेत चालकास मारहाणीसह शासकीय जीपची नासधूसही माफियांनी केली. 

परतूरच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू तस्करी रोखण्यासाठी पथक स्थापन करण्यात आलेले आहे. हे पथक परतूर-सेलू रस्त्यावर गस्त घालत होते. तेव्हा सातोना टी-पॉइंटवर चाळीस ते पन्नास वाळू माफियांच्या टोळीने या पथकाची जीप अडवीत हल्लाबोल केला. यात वाहनचालक शेख अतिक किरकोळ जखमी झाला. तर पथकातील तलाठी अशोक यादव, मुकुंद कुलकर्णी, आर. व्ही. रेड्डी, पी. व्ही. काकडे यांनी तब्बल दहा किलोमीटर अंतरावरील सेलूपर्यंत पळ काढत आपला जीव वाचवला.

विशेष म्हणजे वाळू माफियांनी जीपची नासधूस केली. त्यानंतर जीप सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेऊन उलटवली. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT