फोटो 
मराठवाडा

नांदेडात वाळू माफियांचा महसुलच्या पथकावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी जूना कौठा भागात सोमवारी (ता. २०) सायंकाळी नांदेड तहसीलमधील नायब तहसीलदारांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केल्याची घटना घडली. यात मंडळ अधिकारी जखमी झाले आहेत.

सोमवारी ( ता. २०) जानेवारी रोजी मंडळ अधिकारी के. एम. नागरवाड, अनिल धुळगंडे, तलाठी मनोज देवणे, प्रदीप पाटील, सचिन नरवाडे, बालाजी सोनटक्के, चालक शेख जहीर हे कौठा व हस्सापूर येथील वाळू घाटावर पोचले. या वेळी पथकाने दोन्ही घाटांवर कारवाई करत वीस तराफे जाळून नष्ट केले. वाळू माफियांना याचा राग अनावर झाला. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्यांनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यानंतरही कारवाई सुरूच ठेवत असल्याचे पाहून वाळू माफियांनी शासकीय वाहनावर (एमएच २६ - आर २६११) दगडफेक केली. यात वाहनाच्या काचा फुटल्या आहेत. तसेच पथकावर हल्ला केला. यामध्ये मंडळ अधिकारी के. एम. नागरवाड जखमी झाले. 

तीन्ही आरोपींना पोलिस कोठडी
 
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात के. एम. नागरवाड यांच्या फिर्यादीवरुन शुभम जाधव, दिवा जाधव आणि सुनील जाधव यांच्यासह पन्नास ते साठ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची महिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, प्रदीप काकडे यांच्यासह आदी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. रात्रीच श्री. कच्छवे यांनी वरील तिन्ही आरोपींना अटक केली. अटक आरोपींना फौजदार शेख जावेद यांनी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने तिघांनाही पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

देगुलर तहसिलदारावरही केला होता हल्ला

देगलूर तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. वाळू माफियांवर अनेकवेळा महुसल व पोलिस विभागांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. परंतु वाळू माफियांचे काळे कारनामे काही केल्या थांबत नव्हते. रात्रीच्यावेळी देगलूर तहसिलदार हे एका वाळू घाटावर अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरुध्द कारवाईसाठी आपल्या पथकासह दाखल झाले होते. परंतु वाळू माफियांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून तहसिलदारांनी आपला कसाबसा जीव वाटवून देगलूर गाठले. त्यांच्या तक्रारीवरून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT