file photo 
मराठवाडा

पाथरी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहिर

धनंजय देशपांडे

पाथरी (जिल्हा परभणी) : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर ता. एक रोजी तहसिलदार श्रीकांत निळे यांनी सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम ता. ८, १० व १२ फेब्रुवारी दरम्यान होणार सरपंच व उपसरपंच निवडी.
 
ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर गावागावात सरपंच, उपसरपंच पदासाठी दावेदारांची चर्चा सुरु झाली होती. सर्वांचे निवडीच्या तारखेकडे लक्ष होते. आज तहसीलदार श्रीकांत निळे यांनी निवडीचा कार्यक्रम जाहिर केला असुन आठ, दहा व बारा फेब्रुवारी दरम्यान सरपंच, उपसरपंचाची निवड प्रक्रिया होणार आहे.

यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे तर निवडून आलेल्या सदस्यांना सभेची नोटीस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ग्राम पंचायतनिहाय सरपंच, उपसरंपच निवडीची गाव निहाय तारीख पुढीलप्रमाणे .
ता. आठ फेब्रुवारी
हदगाव, गोंडगाव, गुंज खुर्द, बाबूलतार, निवळी, सिमुरगव्हान, कासापुरी, रेणापूर, देवेगाव, मंजरथ, लिंबा / लिंबा तांडा, डाकूपिंप्री / तारुगव्हान, नाथरा, विटा बु.
दहा फेब्रुवारी
चाटे पिंपळगाव, उमरा, सारोळा बु., पोहेटाकळी, रामपुरी खुर्द, बोरगव्हान, पाथरगव्हान खुर्द, जेतापूरवाडी, खेर्डा / सारोळा खुर्द, बानेगाव, फुलारवाडी, कानसुर / कानसुर तांडा, डोंगरगाव, मसला खुर्द / मसला तांडा.
बारा फेब्रुवारी.
पाटोदा गं.की, अंधापुरी, टाकळगव्हान, देवनाद्रा, बांदरवाडा, झरी, पाथरगव्हान बु., तुरा, रेणाखळी, मर्ड्सगाव, बाभळगाव, आनंदनगर, वरखेड/ किन्होळा, वाघाळा.

नंतरच्या आरक्षणाने वातावरण बिघडले.
निवडणुकीनंतर काढण्यात आलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाने गाव पातळीवरील राजकारणात मोठ्या खलबती झाल्या असून गाव पुढाऱ्यांत निवडणुकीच्या आधी झालेली बोलणी आबाधित राहिल का ? याकडे लक्ष लागले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT