file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात सरपंच आरक्षण सोडत २८, २९ जानेवारीला होणार

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी व वसमत तालुक्याचे सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम गुरुवारी (ता. २८) सकाळी बारा वाजता तसेच हिंगोली व औंढा नागनाथ या तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण कार्यक्रम शुक्रवारी ता. २९ बारा वाजता संबंधित तालुका मुख्यालयी होणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली .

जिल्ह्यात ४९५ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यात ७३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ४२२ ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता. १८) मतमोजणी झाली. त्यानंतर विजयी उमेदवारांसह पँनल प्रमुखांना सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागले होते. यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण रद्द करण्यात आल्याने आता परत सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. 

जिल्ह्यासाठी निर्धारित करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण तालुका निहाय व ग्रामपंचायत निहाय निर्धारित करण्यासाठी  सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी  संबंधीत तालुक्याचे तहसीलदारांना आरक्षण निश्चित करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.जिल्ह्यासाठी त्या त्या तालुक्यातील अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला ( अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्ग यातील महिला ) आरक्षण निश्चित करणेबाबतचे अधिकार तहसिलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते प्रदाने करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सांगितले. आरक्षणाची सोडत काढण्याचा दिनांक निश्चित करुन देण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी (ता.२८) सरपंच पदाचे आरक्षण दुपारी बारा वाजता  सेनगाव, कळमनुरी व वसमत तर शुक्रवारी (ता. २९) हिंगोली व औंढा नागनाथ तालुक्याचे आरक्षण तहसील कार्यालयात होणार आहे. तालुका मुख्यालयाचे ठिकाणी  नमुद दिनांकास अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती , नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण संबंधित तालुक्यांच्या नियुक्त केलेल्या समन्वय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पुर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

Petrol Price Today: जागतिक बाजारात तेलाचे भाव घसरले! आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या ताजे दर

'मला 3 महिने कोंडून ठेवलं आणि...' सुप्रिया पाठारेंनी सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाल्या...'बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार- हर्षवर्धन सपकाळ

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

SCROLL FOR NEXT