Osmanabad News 
मराठवाडा

सास्तूरच्या ग्रामस्थांनी केले गाव बंद, हे होते कारण...

सकाळ वृत्तसेवा

लोहारा (जि. उस्मानाबाद) : तालुक्यातील सास्तूर येथे एका तरूणाचा धारदार शस्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास घडली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी सास्तूरच्या ग्रामस्थांनी बुधवारी (ता. १८) गाव बंद करून रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणी दोन संशयित आरोपींना लोहारा पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दिलीप साहेबराव शिंदे (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत शिंदे याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास दिलीप शिंदे हा क्रांती चौकातून जात असताना खदीर शेख याने उस्मान केळगावे व अन्य एकाच्या मदतीने शिंदे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर गळा चिरून त्याचा खून केला. या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी खदीर शेख याला अटक केली.

त्यानंतर आरोपीस ताब्यात द्या, असे म्हणत जमावाने सास्तूर पोलिस चौकीत गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमाव आटोक्यात येत नसल्याचे पाहून उस्मानाबाद येथून दंगल नियंत्रण पथक व अन्य ठिकाणाहून पोलिसांची कुमक मागविण्यात आली. त्यानंतर जमावावर रात्रभर नियंत्रण ठेवल्याने तणावाचे वातावरण निवळले.

दरम्यान, मुख्य संशयीत आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित दोन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे लावून धरली. जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत बुधवारी सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवली. त्यानंतर उमरगा- सास्तूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

रात्री उशिरा अंत्यसंस्कार

तुळजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक राजेंद्र मोताळे, पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक चौरे यांनी मृताचे नातेवाईक व ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी लोहारा पोलिसांत तिघांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी खदीर शेख, उस्मान केळगावे यांना अटक केली आहे. फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT