shri mahankaleshwar chabina sakal
मराठवाडा

अंधश्रद्धेला छेद! 800 वर्षांची रुढी मोडीत काढत तरुणांनी घेतला श्री महांकाळेश्वर छबिन्याचा फोटो

तिर्थक्षेत्र सासुरे (ता. बार्शी) येथील देवस्थान श्री महांकाळेश्वर छबिन्याचे छायाचित्र काढण्याची व लाईव्ह चित्रीकरण करण्याची घटना तब्बल 8 शतकानंतर सासुरेच्या इतिहासात प्रथमच घडली.

भीष्माचार्य ढवण

तिर्थक्षेत्र सासुरे (ता. बार्शी) येथील देवस्थान श्री महांकाळेश्वर छबिन्याचे छायाचित्र काढण्याची व लाईव्ह चित्रीकरण करण्याची घटना तब्बल 8 शतकानंतर सासुरेच्या इतिहासात प्रथमच घडली.

सासुरे - तिर्थक्षेत्र सासुरे (ता. बार्शी) येथील देवस्थान श्री महांकाळेश्वर छबिन्याचे छायाचित्र काढण्याची व लाईव्ह चित्रीकरण करण्याची घटना तब्बल 8 शतकानंतर सासुरेच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.

प्रत्येक गावाला कोणती ना कोणती रूढ चिकटलेली असते. याप्रमाणे सासुरे येथील देवस्थानच्या मूर्तीचे अथवा छबिन्याचे छायाचित्र काढले तर छायाचित्र टिपणाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मोठी अशुभ घटना घडते, अशी गावकऱ्यात भिती होती. फोटो घेणारांनाही अशी भीती घातली जात असल्याने छायाचित्र काढण्याचे आजमितीला कोणीही धाडस केले नाही.

मंदिराच्या रचनेवरून येथील देवस्थान सुमारे 800 वर्षापूर्वीचे हेमाडपंथी काळापासून असल्याचे स्पष्ट होते. मात्र,इतका प्राचीन इतिहास असलेल्या श्री महांकाळेश्वर देवस्थानच्या मूर्तीचा अथवा दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला निघणाऱ्या छबिन्याचे छायाचित्र कुणीही काढण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे छायाचित्रात आजपर्यंत श्री महांकाळेश्वर देव कधिही कुणीही पाहिला नव्हता. मात्र, यावर्षी सज्जन दळवी, सूरज करंडे, महेश दळवी या तीन तरुणांनी पारंपारिक अंधश्रध्देला छेद देत मूर्ती व छबिन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्क्रीनवरून दाखविण्याचे धाडस केले. ही सासुरेच्या देवस्थान विषयीची ऐतिहासिक अशी घटना असून यामुळे सुमारे 800 वर्षापूर्वीची अंधश्रध्दा संपुष्टात आली आहे.

आपल्या गावचा देव व छबिना जगातील प्रत्येक भाविकाला पाहता यावा व देवाची महती सर्वांपर्यंत पोहचावी. यासाठी नव्या पीढीतील या तरुणांनी देवाच्या छबिन्याचे लाईव्ह प्रक्षेपण चित्रित केले. यानंतर अनेकांनी आपापल्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याचे धाडस केले व ते सोशल मिडीयातून प्रसारितही केले. ही घटना ऐतिहासिक असून या क्रांतीमुळे पुढील काळात घरबसल्या अनेकांना देवाचे दर्शन घेता येईल व छबिनाही पाहता येईल.

'देवाचा छबिना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते, त्यात लहान मुले, महिला चेंगरल्या जात. ही गंभीर बाब ओळखून तरुण शिक्षक सज्जन दळवी, अभियंता सूरज करंडे, महेश सुतार यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चातून चित्रीकरण केले व ते स्क्रीनवर प्रसारित केले, त्यामुळे सर्वांना शांततेत दर्शन घेता आले.'

- तात्यासाहेब करंडे, सरपंच, सासुरे, ता. बार्शी.

'डिजीटल युगात आपले देवस्थान अपडेट व्हायला हवे, सर्वांपर्यंत देव पोचला तर प्रसिद्धी व निधी मिळू शकतो. त्यातून देवस्थानचा विकास होऊ शकतो. यासाठी लाईव्ह चित्रीकरण करण्याचे ठरवले. हे आमच्यासाठी आव्हान होते. ट्रस्ट्रमधील एकेकांना गाठून विषय पटवून देऊन परवानगी मिळवली. पुढील काळात ब्रॉडकास्टींग करण्याचा विचार आहे .

- अभियंता सूरज करंडे, सासुरे, ता. बार्शी.

काळाच्या ओघात सर्वानी अपडेट व्हायला हवे, देवाचा किंवा छबिन्याचा फोटो काढणे काही गैर नाही. प्रत्येक देवदेवतांचे फोटो व मूर्त्या पाहायला मिळतात. मात्र, आमच्या गावातील लोकांचे मनपरिवर्तन व्हायला 21 वे शतक उजाडले.

- सज्जन दळवी, सासुरे, ता. बार्शी.

'आजपर्यंत देवाचा व छबिन्याचा फोटो काढले तर अवकृपा होते. अशी जेष्ठांकडून भीती घातली जायची म्हणून कुणीच धाडस करत नसत. त्यामुळे देवाचा फोटो कुठेही उपलब्ध नव्हता. मात्र, स्क्रीनवरून प्रक्षेपण केल्याने लोकांच्या मनातील भीती दूर झाली व अनेकांनी प्रथमच देवाचे फोटो काढले.'

- बालाजी आवारे, सासुरे, ता. बार्शी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT