गणोरी (ता. फुलंब्री) : विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात हरिभाऊ बागडे यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अंबादास दानवे, अब्दुल समीर यांनी लावलेली हजेरी.  
मराठवाडा

गणोरीत सत्तारांचा राजीनामा मंजूर

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री, ता. 2 (जि.औरंगाबाद) ः आमदार अब्दुल सत्तार यांनी एकीकडे शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसरीकडे त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केला आहे.

गेल्या चार-पाच महिन्यांपासून अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार की शिवसेनेत याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्क सुरू होते. मात्र, सत्तारांनी गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, सोमवारी गणोरी (ता. फुलंब्री) येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले होते.

हा कार्यक्रम सुरू असताना नवनिर्वाचित आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, सिल्लोड नगर परिषदेचे उपाध्यक्ष अब्दुल समीर यांनी सकाळी अकराच्या सुमारास कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. हा कार्यक्रम साडेबारापर्यंत चालला. यावेळी अंबादास दानवे, अब्दुल समिर या दोघांचा सत्कारही करण्यात आला. श्री. दानवे यानी भाषण करून हरिभाऊ बागडे यांच्या कामाचे कौतुकही केले. अब्दुल सत्तार यांच्या आमदारकीचे राजीनामापत्र घेऊन हे दोघे आले होते. कार्यक्रम संपल्यावर हरिभाऊ बागडे, अंबादास दानवे, अब्दुल समीर हे गणोरीतील रवींद्र गायकवाड यांच्या घरी बसले. येथे श्री. बागडे यांनी श्री. सत्तार यांचा राजीनामा मंजूर केला. त्यानंतर उद्धव ठाकरे, हरिभाऊ बागडे यांच्यात मोबाईलवर संभाषणही झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.



गणोरीत विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अब्दुल समीर, अंबादास दानवे विहित नमुन्यात घेऊन आले होते. त्यामुळे राजीनामा स्वीकारला असून मंजूरही करण्यात आला आहे.
- हरिभाऊ बागडे, अध्यक्ष, विधानसभा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT