उदगीर : विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतात दाखल झालेले राफेल विमान उडवण्याचा बहुमान उदगीर चे सुपुत्र स्क्वाड्रन लीडर सौरभ अम्बुरेला मिळाला. राफेल विमानासोबत सौरभ अम्बुरे.  
मराठवाडा

उदगीरच्या सौरभ अम्बुरेला मिळाला राफेल उडवण्याचा पहिला मान

युवराज धोतरे

उदगीर (जि. लातूर ) ः  शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळा स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अंम्बुरे याला अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळाला आहे. 


 भारतीय वायुदलामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमान राफेल सहभागी झाल्याचा आनंद भारतीयांना झालेला आहे. परंतु राफेल विमान उडवण्याचा पहिला मान उदगीरात बालपण गेलेल्या स्क्वाड्रन लीडर सौरभ अंम्बुरे 
यांना मिळाल्याने येथील नागरिकांतून आनंद व्यक्त होत आहे.

स्क्वाड्रन लीडर सौरभ अंम्बुरे यांचे उदगीर हे आजोळ आहे. कर्नाटकातील बिदर हे त्यांचे मूळ गाव असले तरी त्यांचे आई- वडील दोघेही उदगीर येथे एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये नोकरीस होते.


त्यामुळे अम्बुरे कुटुंबीय उदगीरात वास्तव्यास होते.स्क्वाड्रन लीडर सौरभ अम्बुरे यांचे प्राथमिक शिक्षण येथील विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण सातारा सैनिकी स्कूल येथे झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अम्बुरे यांचे आई - वडील सध्या हैदराबाद येथे राहत असल्याचे त्यांच्या उदगीर येथील नातलगांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026

अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

झोपेची पद्धत आणि कणा

ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!

SCROLL FOR NEXT