फोटो 
मराठवाडा

एका हातात स्कॅनर...दुसऱ्या हातावर भाकर...

प्रल्हाद कांबळे

नांदेड : आदिवासी भागातील सावरगाव तांडा (ता. किनवट) येथे भारतीय डाक विभाग नांदेडची टीम सकाळी न्याहरीच्या वेळात या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना त्यांच्या राष्टीयकृत बँकेतील पैसे अत्याआवश्यक संसाराला लागणाऱ्या अन्न- धान्य व शेतीच्या कामासाठी पोस्टमन यांनी AEPS मार्फत घरपोच पैसे नागरिकांना डाक विभागाच्या मायक्रोनी आधार कार्डद्वारे पैसे देत आहेत. यामुळे अनेक शहरात व बँकेत गर्दी कमी झाल्याचे दिसून येते आहे.

सावरगाव तांड्यातील पोस्टमन घरपोच प्रत्येकाच्या घरी पैसे देत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना डाक विभाग ही आमच्यासाठी संजीवनी मिळाली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
अरे संसार... संसार..... जसा तवा चुल्हावर...
आधी हाताला चटके....तेव्हा मिळते भाकर....
अरे संसार... संसार... खोटा कधी म्हणू नये....
राऊळाच्या कळसाला... नोटा कधी म्हणू नये..
अरे संसार संसार.., जसा तवा चुल्हावर...
आधी हाताला चटके... तेव्हा मिळते भाकर..
या कवितेच्या पक्तींप्रमाणे ग्रामिण भागातील नागरिकांचा संसार चालतो. हातावर भाकर असताना दुसऱ्या हातावर टपाल बँकेचे पैसे काढणारे यंत्र. सकाळी न्याहारीच्या वेळी घरी घेऊन येणारा पोस्टमन हे खऱ्या अर्थाने गरीबांसाठी देवदुत ठरत आहे. 

पोस्टमन साहेब..डोळ्याने दिसते पण....जग बघता येत नाही...आयुष्यच गेलं लोकडाऊन मध्येचं: अपंगांची व्यथा..

इस्लापुर : भिशी येथील पोस्टमन ज्ञानेश्वर नूनेवार हे दररोज भिशी पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत लॉकडाउन मध्ये आपले डाक विभागाचे काम करीत असतात. कोरोनाच्या संकटात संपूर्ण नागरिक हैराण झाले असून त्यांच्या मदतीला केंद्र व राज्य सरकारने गोरगरीबाच्या बँकेच्या खात्यात अनुदान जमा करीत आहे तर राशन दुकानात मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे.

भिशी गावातील दिव्यांग बाबासाहेब फुलझाडे 

शासनाने बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँकेला जाण्यासाठी मार्ग नाही.
असेल तरी बँकेसमोर मोठी गर्दी तासोनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यातल्यात्यात मी शंभर टक्के अपंग असलेले भिशी गावातील बाबासाहेब फुलझाडे हे गावातील एका घराच्या आसऱ्याला पोस्टमनची वाट पाहत बसला होता.

डोळ्यांनी सर्व दिसते पण जग बघता येत नाही

पोस्टमन दिसताच म्हणाले पोस्टमन साहेब...डोळ्यांनी सर्व दिसते पण जग बघता येत नाही..माझं आयुष्यच चाललंय घरात बसून साहेब..आमची पगार आली काय?
ही व्याथा शंभर टक्के अपंग असलेले बाबासाहेब फुलझाडे यांची आहे.

बाबासाहेब याचे आधार कार्ड क्रमांक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला जोडले

पोस्टमन यांनी बाबासाहेब याचे आधार कार्ड क्रमांक इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला जोडले त्यामध्ये पैसे जमा झाले असल्याचे पोस्टमन यांनी सांगितले. त्याच्या खात्यातील पैसे पोस्टमन यांनी त्यांना त्यांच्या दारी काढून दिल्याने बाबासाहेब फुलझाडे यांना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनाला भिडला असल्याचे दिसून आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT