File photo 
मराठवाडा

‘या’ जिल्ह्यात टंचाईवर पाण्यासारखा खर्च

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात उन्हाळी टंचाईंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी यंदा ३५ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यात सर्वाधिक १३ कोटी ६७ लाख टॅंकर इंधनावर, आठ कोटी ७४ लाख विहीर अधिगृहणावर, तर सात कोटी ३३ लाख नळ योजनांच्या दुरुस्तीवर खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत जिल्ह्यात १५१ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. तर एक हजार १२२ ठिकाणी विहीर व कूपनलिकांचे अधिगृहण करण्यात आले होते. या सोबतच नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विधंन विहीर कार्यक्रम, तात्पुरती पूरक नळ योजना, नागरी तातडीची पाणीपुरवठा योजना, टॅंकर अधिगृहण, विहीर व कूपनलिका अधिगृहण तसेच लोहा नगरपालिकेसाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना राबविण्यात आल्या.

आठ कोटी रुपये मिळणे बाकी

यासाठी ३५ कोटी ८७ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. यात ग्रामीण भागासाठी ३५ कोटी ३९ लाख ४७ हजार, तर नागरी भागासाठी ४७ लाख ९९ हजार रुपये खर्च झाला. या खर्चापैकी शासनाकडून ता. चार नोव्हेंबर रोजी २८ कोटी रुपये प्राप्त झाले असून, अद्याप आठ कोटी रुपये मिळणे बाकी असल्याची माहिती मिळाली.

मुखेडमध्ये सर्वाधिक टॅंकर
टंचाइ काळात सर्वाधिक मुखेड तालुक्याताय २७ गावे आणि ४२ वाड्यांवर ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यापाठोपाठ लोहा तालुक्यात २७ टँकरद्वारे १८ गावे आणि आठ वाड्यांवर, तर नांदेड तालुक्यात २० टँकरद्वारे १२ गावे आणि तीन वाड्यांवर, लोहा नगरपरिषदेच्या हद्दीतील ३० हजार लोकसंख्येला १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच कंधार तालुक्यात दहा, माहूर तालुक्यात आठ, देगलूर तालुक्यात सहा, नायगाव आणि हदगाव तालुक्यात प्रत्येकी पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. या सोबतच उमरी, भोकर आणि हिमायतनगर या तालुक्यांतही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.


टंचाईवर झालेला खर्च (लाखात)
योजना ---- खर्च
नळ योजनांची विशेष दुरुस्ती - ७३३.२५
विधंन विहीर कार्यक्रम - १४३.००
तात्पुरती पूरक नळ योजना(नागरी) - ४३४.२९
टॅंकर इंधन - १३६७.९०
विहीर अधिगृहण - ८७४.६९
लोहा पालिकेसाठी पाणीपुरवठा - ३४.३३
एकूण - ३५८७.४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : किल्ल्यांवर 'थर्टी फर्स्ट'ला बंदी गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून गस्त,बंदोबस्तात वाढ

Happy New Year 2026 Wishes: नववर्ष 2026 ची सुरुवात करा प्रेमाने! मित्र-परिवाराला पाठवा मनापासूनच्या शुभेच्छा, वर्ष होईल खास

Bank Holiday : आज वर्षाचा शेवटचा दिवस! ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला बँका बंद की सुरू? बँकेत जाण्याआधी हे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT