hingoli hingoli
मराठवाडा

हिंगोलीत दोन हजाराची लाच घेणारा प्राचार्य एसीबीच्या जाळ्यात

प्राचार्य राठोड याने दोन हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे

विठ्ठल देशमुख

प्राचार्य राठोड याने दोन हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे

सेनगाव (हिंगोली): तालुक्यातील हत्ता येथील महाकाली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप राठोड यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लुचलचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. १३ सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान सेनगाव येथे रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचे जात प्रमाणापत्र पडताळणीसाठी हिंगोली येथील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाकडे पाठविण्याबाबत त्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने प्राचार्य राठोड याच्याकडे विनंती केली होती. मात्र त्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी त्यांनी केली. सदर रक्कम देण्याचे मान्य केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा प्रस्ताव हिंगोलीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे पाठविण्यात आला. दरम्यान, सदर रक्कम आज सेनगाव येथे देण्याचे ठरले होते. मात्र संबंधित विद्यार्थ्याच्या नातेवाईकाने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर झालेल्या पडताळणी नंतर आज लाचलुचपतचे उपाधीक्षक निलेश सुरडकर, जमादार विजयकुमार उपरे, अवि किर्तनकार, तान्हाजी मुंढे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, हिंमतराव सरनाईक यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता सापळा रचला होता. यावेळी ठरल्या प्रमाणे प्राचार्य राठोड याने दोन हजार रुपयांची लाच स्विकारताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरील रक्कम सेनगाव येथील मेडिकल चालक हनुमान रवणे यांच्यामार्फत स्वीकारल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarange Patil Audio Clip : जरांगे-पाटील यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाला मोठे वळण! मंत्री उदय सामंतांनी केली 'ही' मागणी, भाजपलाही खुलासा करण्याचं केलं आवाहन

IND vs NZ 2nd T20I: इशान किशन, भुवनेश्वर कुमार OUT? दुसऱ्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल, चक्रावणारा संघ

Pakistan-Iran Border: पाकिस्तान-इराण सीमेवर हिंसाचाराला सुरुवात; असिम मुनीर यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर तणाव वाढला

Marathi News Live Updates: सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, दोन प्रवासी जखमी

Shamonda Virus : फ्रान्समध्ये प्राण्यांत आढळणाऱ्या शामोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग; बाधित रुग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT