file photo 
मराठवाडा

हिंगोलीत रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा चाप, संचारबंदीचा दुसरा दिवस

राजेश दारव्हेकर

हिंगोली :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  सात दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांनी विनाकारण रस्त्यावरून फिरू नये, अशा सूचना दिलेल्या असतानाही काहीजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे मंगळवारी (ता. दोन) रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्या काही नागरिकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. शिवाय रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहनांचीही पोलीस प्रशासन व नगरपालिकेच्या पथकाद्वारे तपासणी केली जात आहे.

जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या संचारबंदी दरम्यान कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, आवश्यकता असल्यास प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिवाय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तशा सूचनाही दिल्या आहेत. 

जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मंगळवारी शहरातील गांधी चौक भागातून  काही जण दुचाकीवरून विनाकारण फिरताना पोलिसांना आढळून आले. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमानी दुचाकीवरून पळ काढला यावेळी पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिला. संचारबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर विनाकारण पडू नये शिवाय रस्त्यावरूनही फिरू नये असे आवाहन  जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

शहरातील प्रत्येक  चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात असून ये- जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे कर्तव्यावर हजर होण्यासाठी ये- जा करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र आहे किंवा नाही याची तपासणी  पोलिस अधिकारी व कर्मचारी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संचारबंदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Netanyahu Conflict : डोनाल्ड ट्रम्प संतापले ! इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना वाहिली शिव्यांची लाखोली; नेमकं काय घडलं?

बाबो! रणवीर सिंहची संपत्ती ऐकून व्हाल थक्क; आलिशान घरं, लक्झरी गाड्यांचा ताफा आणि बरंच काही

MSME loan Scheme: लघु व मध्यम उद्योगांसाठी तातडीची कर्ज हमी योजना; एकूण दोन लाख ५५ हजार कोटींचा निधी

JEE Advanced 2026 : मोठी बातमी! जेईई ॲडव्हान्स्डमध्ये शुभम कुमार देशात पहिला; पुण्याची आरोही मुलींमध्ये अव्वल

Monsoon 2026: मान्सून 26 मे रोजी केरळात येणार होता, मग अचानक कुठे गायब झाला? IMD ने सांगितले खरे कारण

SCROLL FOR NEXT