Secret Money esakal
मराठवाडा

गुप्तधनाच्या गुपिताला सहा महिन्यांनी फुटली वाचा! वाटा न मिळाल्याने तिघांमध्ये वाद, हंडाभर गुप्तधन सापडलं अन्..

सुरुडी येथील (Surudi in Ashti Taluka) एका जुन्या वाड्याचे खोदकाम करताना हंडाभर गुप्तधन सापडले.

अनिरुद्ध धर्माधिकारी

गुप्तधन सापडलेला जागामालक मध्यमवर्गीय आहे, तर दोघे मजूर आहेत. सहा महिन्यांपूर्वी सापडलेल्या या गुप्तधनाची चर्चा गावात झाली.

आष्टी : तालुक्यातील सुरुडी येथील (Surudi in Ashti Taluka) एका जुन्या वाड्याचे खोदकाम करताना हंडाभर गुप्तधन सापडले. जागामालकासह काम करणा-या दोन मजुरांनी कोणाला काहीही माहिती होऊ न देता त्याची विल्हेवाट लावली. परंतु, वाट्याच्या वादातून यातील एकाने या गुप्तधनातील सोन्याच्या नाण्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकून या प्रकरणाला वाचा फोडली. पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेले असले, तरी पुरातत्त्व विभाग (Archaeology Department) व महसूल विभाग मात्र याबाबत अद्याप अनभिज्ञ राहिला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील मौजे सुरुडी येथे एकाने जुना पडीक वाडा काही वर्षांपूर्वी खरेदी केला होता. जुन्या काळी शे-दोनशे वर्षांपूर्वी या जागेत एक मारवाडी कुटुंब राहत असल्याचे बोलले जात आहे. या जागेवर जानेवारी महिन्यात घराच्या बांधकामासाठी पाया खोदकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. नोकरीस असलेला हा व्यक्ती ड्युटीला गेल्यानंतर या ठिकाणी दोन मजूर पाया खोदत असताना यातील एक मजूर थोडा वेळासाठी काम सोडून बाहेर गेला.

काम करत असलेल्या दुस-या मजुराला जमिनीतील एका भिंतीत गाडलेल्या अवस्थेतील सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. घाईगडबडीत या मजुराने सापडलेल्या मोहरा पॅन्टच्या खिशात व बनियनमध्ये टाकून घर गाठले. तेथे मोहरा ठेवून परत कामावर आला. उर्वरित मोहरा घेऊन जाण्यासाठी पॅन्टमध्ये भरल्यानंतर जागेचा मालक आला व त्याने हा प्रकार बघितल्याचे बोलले जात आहे.

या दोघांची तडजोड चालू असताना दुसरा मजूरही योगायोगाने तेथे दाखल झाला. यानंतर तडजोडीत त्यालाही काही रक्कम देण्याचे ठरले व वाच्यता न करण्याचे सांगण्यात आले. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या या तडजोडीत दुस-या मजुराला ठरल्याप्रमाणे रक्कम न मिळाल्याने त्याने गुप्तधन सापडल्याचा गावभर बोभाटा केला.

तसेच पुरावा म्हणून सापडलेल्या मोहरांतील सोन्याच्या मोहरांचे छायाचित्रही सोशल मीडियावर टाकले, असल्याचे बोलले जात आहे. हातात सोन्याची मोहरा असलेले हे छायाचित्र झपाट्याने सर्वत्र पसरून गुप्तधनाची वार्ता तालुक्यात पसरली. या नाण्याच्या छायाचित्रावरून हे नाणे यादवकालीन असल्याचे सांगितले जात असून, पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परंतु, पुरातत्त्व किंवा महसूल विभागाचे कोणी अद्याप तिकडे फिरकलेले नाही.

यादवकालीन मोहरा

छायाचित्रावरून या सोन्याच्या मोहरा यादवकालीन म्हणजे अंदाजे हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचे सांगितले जात आहे. मोहरा हातात घेतलेले छायाचित्र कोणी टाकले, याचा तपास केल्यास या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. त्यादृष्टीने पोलिसांसह महसूल व पुरातत्त्व विभागाने शोध घेण्याची गरज आहे.

राहणीमानात बदल नाही, जमीनजुमल्याची खरेदी

गुप्तधन सापडलेला जागामालक मध्यमवर्गीय आहे, तर दोघे मजूर आहेत. सहा महिन्यांपूर्वी सापडलेल्या या गुप्तधनाची चर्चा गावात झाली. परंतु, गुप्तधन सापडल्याचा संशय येऊ नये म्हणून संबंधितांनी त्यांच्या राहणीमानात कोणताही बदल केला नाही. आता या प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर संबंधिताने पुण्यासारख्या शहरात जमीनजुमला खरेदी केला असल्याची माहिती ग्रामस्थांच्या कानावर आली आहे.

घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. परंतु, परिसरातील चर्चेनंतर घटनास्थळी भेट देवून विचारपूस केली. त्यानुसार या प्रकारात काही तथ्य नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

-विजय नरवाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, आष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT