गंगाखेड शहरातील ‘त्या’ आवाजाचे रहस्य गूढच 
मराठवाडा

गंगाखेड शहरातील ‘त्या’ आवाजाचे रहस्य गूढच

प्रा. डॉ. अंकुश वाघमारे

गंगाखेड - गंगाखेड (जि. परभणी) शहर आणि परिसतील भागामध्ये सोमवारी (ता. २४) सकाळी पावणेबाराच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. मात्र तो कोठे झाला आणि तो आवाज कशाचा होता. या संदर्भात शहरात दिवसभर चर्चेस उधाण आले असून त्या आवाजा संदर्भात प्रशासनही अनभिज्ञ आहे.

गंगाखेड शहरातील नागरिक दैनंदिन कामकाजात नेहमीप्रमाणे व्यस्त होते. परंतु अचानक शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये सोमवारी (ता. २४) सकाळी पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान मोठा आवाज आला. मोठ्या आवाजासह जमिनीत सुद्धा कंपन झाले. यामुळे शहरातील नागरिक अचानक झालेल्या भूगर्भातील हालचालीमुळे भयभीत झाले. 

नागरिक आले घराबाहेर
आवाज आल्यानंतर बाहेर असणाऱ्या नागरिकांनी जमीनीकडे पाहत नंतर आभाळाकडे सुद्धा पाहिले. परंतु गोंधळात पडलेल्या सर्वच नागरिकांनी एकमेकांकडे पाहिले. परंतु प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले होते. घरामधील कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना भूकंप झाला की काय? असे वाटताच बालकांसह महिलांनी घराच्या बाहेर पळ काढला. अचानक आलेल्या या आवाजामध्ये शहरातील अनेक नागरिकांच्या घराच्या काचास तडेही गेल्याच्या घटना घडल्या. 

मोबाईलवर झाली विचारणा
बाहेर असणाऱ्या नागरिकांनी आवाज ऐकताच तत्काळ भ्रमणध्वनीद्वारे आपल्या घरातील खुशाली विचारली. तसेच आवाजाचे गुढ काय हे विचारण्यासाठी शहरातील प्रत्येकाने भ्रमणध्वनीद्वारे एकमेकास संपर्क साधला. तो मोठा आवाज सर्वांनीच ऐकला होता. परंतु तो मोठा आवाज कशाचा होता? हे शहरातील नागरिकांना कळाले नाही. शहरात उलट सुलट चर्चेस उधाण होते. यामध्ये टाकीचा स्फोट झाला असेल, भूकंप झाला, ट्रकचे टायर फुटले असेल किंवा गोदावरी नदीत ब्लास्टिंग होत असेल. परंतु यापैकी काहीही झाले नसून त्या आवाजाचे रहस्य गूढच आहे.

पहिल्यांदाच घडली घटना
गंगाखेड शहरात अशी आवाज ऐकू येण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. त्यामुळे सुरवातीला नागरिकांना कशाचा आवाज आहे, हे कळाले नाही. नंतर भूकंप असू शकतो म्हटल्यावर अनेक नागरिक भयभीत झाले आणि मुलांसह घराबाहेर आले. काही वेळ रस्त्यावर नागरिक थांबल्यानंतर पुन्हा घरात गेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत प्रशासनाकडून मात्र, अजून हा आवाज नेमका कशाचा आहे, याबाबतची माहिती आली नाही. प्रशासनाकडूनही याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते. 

तो आवाज कशाचा 
आम्ही सर्व शिक्षिका आमच्या शाळेमध्ये बसलो होतो. त्यावेळी अचानक खुप मोठा आवाज ऐकू आला. परंतु तो आवाज कशाचा होता हे आम्हालाही कळले नाही. यामध्ये आमच्या शाळेतील खिडक्यांच्या काही काचा फुटल्या आहेत. - सविता हराळे, सहशिक्षिका, गंगाखेड.


संपादन - अभय कुळकजाईकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीएसटीच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, आता विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा खरेदीदाराला नाही, विधी समितीने 'त्या' प्रस्तावाला दिली मंजुरी

Kothrud Assault: कोथरूडमध्ये जुन्या वादातून तरुणावर स्टंपने बेदम मारहाण; मध्यस्थ नागरिकांनाही धमक्या

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

Marathi Books: इतिहास, कविता, धर्म आणि काश्मीर सफर; चार नवी पुस्तके.. वाचनविश्वात नव्या पानांची भर

गडचिरोलीत पुन्हा माओवादी हालचालींची चाहूल? कुंडमजवळ बॅनर-पत्रके आढळली; नेमकं काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT