file photo
file photo 
मराठवाडा

सेलू : गैरव्यवहार दडपण्यासाठी लेखणी बंदचे हत्यार

विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी) : सेलू व शेलवाडी येथिल तलाठी यांनी अतिवृष्टि अनुदान व जमिनीचे परस्पर फेरफार करुन केलेला गैरव्यवहार दडपण्यासाठी महसुल कर्मचारी संघटनाकडुन लेखणी बंद अंदोलनाचे हत्यार उपसण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळी कालाटणी मिळाली आहे. तहसिलदार बालाजी शेवाळे हे कर्मचा-यांना विनाकरण त्रास देत अपमानीत करत असल्याने महसुल कर्मचारी संघटनेने सोमवारी ( ता.५)  रोजी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांना निवेदन देवुन लेखणी बंद अंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 

या संबधीत प्रकरणामध्ये सेलू व शेलवाडी सज्जाचे तलाठी मुकुंद आष्टीकर यांनी मागील वर्षी अतिवृष्टि अनुदान वाटपात गैरव्यवहार करुन शेतकरी नसतांना अशा लोकांच्या नावे अनुदान रक्कम दिली होती. तसेच सेलू येथील डाॅ. राजेश विश्वनाथ गायकवाड यांचे नाव साताबारा उता-यातुन गायब करुन त्या जमिनीवर इतर लोकांची नावे टाकल्याचे तहसिलदार बालाजी शेवाळे यांच्या तपासणी अंती निदर्शनास आले होते. त्यानुसार तलाठी मुकुंद आष्टीकर यांना नोटीस बजावण्यात आली होती.

संघटनेच्या माध्यमातुन दबाव टाकण्याचा प्रयत्न

त्यानुसार त्यांनी खुलासा सुद्धा सादर केला होता. परस्पर शेतक-यांची नावे सातबारा उता-यावरुन गायब कशी होतात हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत असुन शेतक-यांची शेती सुरक्षीत नसल्याचे समोर येत  आहे. केलेला गैरव्यवहार दडपण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातुन अंदोलने करुन संबधीत कर्मचारी हे तहसिलदार बालाजी शेवाळे यांच्यावर संघटनेच्या माध्यमातुन दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी मात्र सदरील घडलेल्या घटनांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. 

कामात अनियमितता

सेलू व शेलवाडी सज्जाचे तलाठी मुकंद आष्टीकर यांनी अतिवृष्टि अनुदान वाटपात गैरव्यवहार करुन शेतकरी नसलेल्या लाभार्थ्यांची नावे अतिवृष्टि अनुदान यादीमध्ये समाविष्ट करुन त्या लाभार्थ्यांना अनुदान दिले ही गंभीर बाब आहे. तसेच सेलू येथील सज्जामध्ये डाॅ. राजेश गायकवाड यांचे नावे असलेला सातबारा इतर लोकांच्या नावे परस्पर करुन दिला. डाॅ. गायकवाड यांनी सर्व पुराव्या निशी तक्रार कार्यालयात दाखल केली. त्या अनुषंघाने सर्व कागद पत्राची तपासणी केली असता त्यामध्ये अफरातफर झाल्याचे सिद्ध होत असल्याने हे सर्व प्रकार दडविण्यासाठी विनाकारण निवेदने देवुन संघटनेच्या माध्यमातुन दबाव आणला जात असला तरी सुद्धा त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात येणार असुन त्यांच्या कामात अनियमितता असल्याची प्रतिक्रया तहसिलदार बालाजी शेवाळे यांनी यावेळी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT