मराठवाडा

ई मेलवर अर्ज करा अन्‌ आरटीओचे प्रमाणपत्र घ्या

हरी तुगावकर

लातूर ः अत्यावश्यक सेवा व वस्तूंची ने आण करण्यासाठी रस्त्यावर वाहनांना फिरावे लागत आहे. सध्या संचारबंदी आहे. अशा वाहनांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यानंतर हे वाहने रस्त्यावर धावत आहेत. पण या करीता परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आता परिवहन विभाग ई-मेलवर संबंधित वाहनधारकांचा अर्ज स्वीकारणार आहे. अर्ज व कागदपत्रांची वैधता पाहून तातडीने ई मेलवरूनच संबंधिताला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.


कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. पण यात अत्यावश्यक वस्तूला सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. या करीता लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्षही सुरु करण्यात आला आहे. सध्या राज्यभरात संचारबंदी लागू आहे. संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे ठरत आहे. तसेच परिवहन कार्यालयात गर्दीही होत आहे.

या कार्यालयातील गर्दी टाळण्यासठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यालयाच्या ई-मेलवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत वाहनाची वैध कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, विमा, वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र आदी याची प्रत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहतुकीचा माल हा अत्यावश्यक वस्तू असणे गरजेचे आहे. त्याचे वर्णनही अर्जात नमूद करावे लागणार आहे. असा अर्ज आल्यानंतर वाहनात तात्काळ प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्र सुद्धा अर्जदाराच्या ईमेलवरच दिले जाणार आहे. या करीता वाहनधारकांना या कार्यालयाच्या mh२४@mahatrnscom.in या ई-मेल आयडीवर अर्ज करावा.

तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांनी स्वतःचे असे स्टीकर आपल्या वाहनावर लावावे, असे आवाहन या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जे वाहनधारक परिवहन विभागाच्या प्रमाणपत्राची कार्यालयात मागणी करतील त्यांनाही परिवहन विभागाचे प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे, अशी माहितीही या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT