file photo 
मराठवाडा

खळबळ..! डीवायएसपींचा मोबाईल चोरीला

प्रल्हाद कांबळे

नांदेड : सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा २७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही घटना हनुमानगड आठवडी बाजारात शनिवारी (ता. एक) सायंकाळी घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात काही वर्षे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावलेले माणिकराव पेरके यांना पदोन्नती नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून इतर जिल्ह्यात कर्तव्य बजावल्यानंतर सेवानिवृत्त झाले. श्री पेरके हे शनिवारी (ता. एक) फेब्रुवारी रोजी हनुमान गड येथे देवदर्शन घेऊन घराकडे जात होते. ते आठवडी बाजारातून जात असताना सायंकाळी चोरट्याने त्यांच्या खिशातील २७ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी माणिकराव पेरके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना चोरट्याचा असा अनुभव घ्यावा लागल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे.

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सावरगाव (ता. अर्धापूर) येथे शनिवारी (ता. एक) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

अर्धापूर तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण आबादार यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. तरीसुद्धा हिंमत न हारता ते आपल्या शेतीत मशागत करून घाम गाळत असत. मात्र लहरी निसर्ग त्याला साथ देत नसल्याने शेतीतील उत्पन्न घटले. त्यामुळे ज्ञानेश्‍वर आबादार यांनी घरप्रपंच चालविण्यासाठी बँकेचे कर्ज काढले. यावर्षीही नापिकी झाल्याने बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढला. उत्पादन घटल्याने कर्ज कसे परत करावे या विवंचनेत असलेल्या श्री. आबादार यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दत्ता आबादार यांच्या माहितीवरून अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार श्री. पवार करत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT