file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात खळबळजनक घटना : लग्न करुन न देणाऱ्या मावशी, आजीचा तरुणाने केला खून; आईसुद्धा गंभीर

राजेश दारव्हेकर

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे लग्न का करुन देत नाही या कारणावरुन एका तरुणाने आई, मावशी व आजीच्या डोक्यात वार केल्याची घटना शनिवारी (ता. २०) सकाळी साडेसातच्या घडली आहे. यात मावशी व आजीचा मृत्यू झाला असून गंभीर असलेल्या आईवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील अनुसयाबाई चऱ्हाटे यांचे पुसेगाव शिवारात शेत आहे. त्या ठिकाणी त्या त्यांची आई देवकाबाई पहारे यांच्यासोबत राहतात. तर त्यांचा मुलगा रोहिदास चऱ्हाटे हा पुसेगावात राहून एका हॉटेलमध्ये काम करतो. मागील काही दिवसांपासून रोहिदास याने लग्न करुन देण्यासाठी त्याची आई अनुसयाबाई यांच्याकडे तगादा लावला होता. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

त्यामुळे आठ दिवसांपासून तो रागातच होता. त्यातच त्याची मावशी मंगलाबाई बशिरे ( रा. परभणी ) ह्या त्यांची बहिण अनुसयाबाई व आई देवकाबाई यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे त्या तिघीही शेतातील आखाड्यावर राहत  होत्या. शनिवारी (ता. २०) सकाळी रोहिदास कुऱ्हाड घेऊन आखाड्याकडे गेला. त्याने मावशी मंगलाबाई बशिरे (वय ४२) यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार केल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर कुऱ्हाडीच्या दांड्याचा वार झाल्याने देवकाबाई पहारे (वय ८५) ह्या गंभीर जखमी झाल्या. अनुसयाबाई चऱ्हाटे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार झाल्याने त्या देखील जखमी झाल्या. त्यानंतर रोहिदास याचा चुलतभाऊ व अन्य तिघे जण शेतात जात असतांना त्यांना हा प्रकार दिसला. नंतर रोहिदास त्यांच्याही पाठीमागे लागला. त्यामुळे तो पळून गेला. काही वेळानंतर त्यांनी परत घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या देवकाबाई पहारे व अनुसयाबाई चऱ्हाटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपपार सुरु असताना देवकाबाई यांचा मृत्यू झाला. तर अनुसयाबाई यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, नर्सी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी  यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी परिसरात लपून बसलेल्या रोहिदास चऱ्हाटे यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : 15 सप्टेंबरच्या निर्णयानंतर UPI पेमेंटवर MDR शुल्क; PhonePe-Google Payच्या कमाईत मोठी वाढ होण्याची शक्यता

Diwali Railway Tickets : दिवाळीच्या रेल्वे तिकिटांना आतापासूनच प्रतीक्षा ; आरक्षण सुरू होताच पाच मिनिटांत ‘रिग्रेट’; लांब पल्ल्याच्या गाड्यांना मागणी

Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्र्यांचा आजपासून दुष्काळ पाहणी दौरा

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT