file photo 
मराठवाडा

पांगरा शिंदे येथील जमीनीतील गुढ आवाजाची मालिका सुरूच, आज भल्या पहाटेच आला गुढ आवाज

राजेश दारव्हेकर

हिंगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही वर्षांपासून जमिनीतून गढ आवाज येत आहेत. ही आवाजाची मालिका अद्यापही सुरू आहे. शनिवारी (ता. १०) भल्या पहाटे चार वाजता व त्यानंतर सात वाजता असे दोन वेळेस आवाज झाले. यामुळे ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या आहेत. हा आवाज कळमनुरी तालुक्यातील काही गावात देखील आला आहे.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षापासून जमिनीतून गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळा हे आवाज आले आहेत. कोणत्याही वेळी अचानक येणाऱ्या या आवाजाने गावकऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह अनेक गावात हे आवाज येत आहेत तसेच कळमनुरी तालुक्यातील काही गावात है आवाज येत आहेत. या आवाजाचे गुढ उकलण्यासाठी स्वारातीम विद्यापीठाच्या टीमने येथे एकदा पाहणी केली मात्र त्याचे गुढ उकलले नाही तर दोन वेळेस या आवाजाची रिश्टर स्केलवर नोंद झाली होती त्यावेळेस लातुर येथील भूकंप मापक यंत्रावर याची नोंद झाली आहे. दोन वेळेस भुकंपाचा सोम्य धक्का बसल्याचे त्मावेळेस प्रशासनाने सांगितले होते.

गावकऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले

मात्र या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही परंतु गावकऱ्यांतून भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, शनिवारी ता. दहा सकाळी चार वाजता व त्यानंतर सात वाजता जमिनीतून गुढ आवाज आला हा आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, सिरळी तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा, येहळेगाव गवळी या गावात देखील  आले आहेत. या आवाजाने कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही मात्र या गावातील गावकऱ्यांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT