nanded news 
मराठवाडा

आई आणि झाडांची सेवा करा- सयाजी शिंदे

शिवचरण वावळे

नांदेड : जिवनात पहिले शिक्षण देते ती आई, तिच आयुष्यातील पहिली गुरु आहे. त्यामुळेच आईने दिलेली शिदोरी आयुष्यभर सरत नाही. आईनंतर खरे दातृत्व कुणाकडे असेल तर, मानवाच्या जन्मल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत कुठलाही भेद न करता नि:स्वार्थ भावनेने प्रत्येकास शुद्ध आॅक्सिजन देणाऱ्या वृक्षाकडे आहे. त्यामुळे आई आणि झाडे यांच्यासारखी दातृत्व दुसरे कुणाकडेच शोधुन मिळणार नाही. काही करायचे असेल तर आई आणि झाडासाठी करा असे परखड मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केले.

हेही वाचानांदेडला विविध विभागाकडून ७२५ कोटींची मागणी

वडांच्या झाडांचा जिल्हा
सयाजी शिंदे शुक्रवारी (ता.२४ जानेवारी २०२०) खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत अरविंद जगताप यांची उपस्थिती होती. श्री. शिंदे म्हणाले की, ‘वडा’च्या अध्यक्षतेखाली पहिले वृक्ष सम्मेलन म्हणजे दुसऱ्यांना शिकवत बसण्यापेक्षा आपण काहीतरी केले पाहिजे. म्हणून या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. बीड जिल्हा हा वडांच्या झाडांचा जिल्हा म्हणून ओळखले जात होता. ही ओळख आज पुसली गेली असून, भविष्यात या जिल्ह्याला पुन्हा वडाचा जिल्हा म्हणून वैभव प्राप्त करुन देण्याच्या हेतुने काम करत आहे.

हेही वाचाआत्मदहानाच्या चर्चेने नांदेडची जिल्हा परिषद तापली

वृक्ष सुंदरींना देणार किताब
फेब्रुवारी २०२० मध्ये मालवण डोंगरावर दोन दिवसीय झाडांचे वृक्ष संमेलन ठेवले असून, या संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा वडाचे झाडच असल्याचे सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले. झाड हे माणसासाठी सर्वाधिक आॅक्सिजन देण्याचे काम करीत असतात. त्यामुळे माणसासाठी काही करायचे असेल तर झाडांसाठी आधी काही करावे लागेल असे मत सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. १५ ते २१ वयोगटातील तरुणीच्या हस्ते वडाचे झाडे लावून त्यानंतर वृक्ष सुंदरी नावाने पुस्तक काढुन पुढे हे पुस्तक या वृक्ष सुंदरींना किताब म्हणून देण्याचे प्रयोजन असल्याचे अभिनेते शिंदे यांनी सांगितले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

UK Car Accident : ब्रिटनमध्ये भीषण अपघात! चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक, ७ जणांचा मृत्यू

Bhuleshwar Ganesh Idol Accident: मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनात हृदयद्रावक दुर्घटना; दोघांचा मृत्यू, चिमुकल्या मुली जखमी

Marathi News Live Updates : अमित शहा यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त देशातील नागरिकांना दिल्या शुभेच्छा !

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT