Seven lakhs of gutka seized FDI and police raids 
मराठवाडा

सतरा लाखाचा गुटखा जप्त; एफडीआय व पोलिसांचा छापा

सकाळवृत्तसेवा

नांदेड : देगलूर नाका व वाजेगाव परिसर हे अवैध धंद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाते. यातच गुप्त माहितीवरुन अन्न व औषध प्रशासनाचे प्रविण काळे यांनी पोलिसांच्या मदतीने वाजेगावमध्ये रविवारी (ता. 28) दुपारी छापा टाकून 17 लाख 20 हजाराचा गुटखा जप्त केला.

गुटखा यासह आदी अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्या मंडळीचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेले अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी शहरातील अवैधरित्या, शासनाची बंदी असलेल्‍या गुटखा विरोधी मोहीम सुरू केली. गुप्त माहितीवरुन त्यांनी आपले सहकारी कावळे यांना सोबत घेऊन नांदेड ग्रामिण पोलिसांची मदत घेतली.

सुटीचा दिवस रविवार असल्याने बेसावध असलेल्या वाजेगाव येथील गुटखा तस्कराने आपले दुकान थाटले होते. अन्न व औषध आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्या ठिकाणी छापा टाकला. मे. दिल्लीg ट्रान्सपोर्ट कपाउंडजवळ असलेल्या गुटख्याच्या गोदामावर कारवाई केली. यावेळी गोदाम मालक मिर्झा महेबुब बेग मिर्झा मोहसीन बेग याला ताब्यात घेतले. गोदामाची झडती घेतली असता विनापरवाना बेकायदेशीररित्या बंदी असलेला युके- 3300 नावाचा गुटखा आढळून आला. सदर गुटख्याचा बाजारभाव 17 लाख 20 हजार रुपये असल्याचे प्रविण काळे सांगितले. पोलिसांनी मिर्झा बेग याला अटक करून त्याच्याविरूध्द नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कारवाईमुळे या भागातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT