जाफराबाद (जि.जालना) : वन विभागाने पिंजरा लावून वानरांना जेरबंद केले. 
मराठवाडा

वानरांच्या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी, आठ तासानंतर जेरबंद

गजानन उदावंत

शहरात वारंवार वानराच्या उच्छादामुळे त्रस्त झालेल्या मंगलसिंग बायस आणि मुकेश भारद्वाज यांनी वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी ए.ए. राठोड, वनरक्षक सोनु जाधव यांच्याशी भ्रमणध्वणीव्दारे संपर्क साधुन जाफराबाद सुरु असलेल्या उच्छादाची माहिती देऊन वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

जाफराबाद(जि.जालना) : गेल्या आठ दिवसांपासून जाफराबाद Jafrabad शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन वानरांनी Monkey उच्छाद मांडला आहे. वानरांनी केलेल्या हल्ल्यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. वन विभागाच्या वन्यजीव प्राणीमित्र समाधान गिरी यांनी तब्बल आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वानरांना पिंजऱ्यांत जेरबंद केले आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, जाफराबाद शहरातील कालिका माता मंदिरा जवळील मंगलसिंग बायस यांच्या सात वर्षाचा मुलगा पृथ्वीसिंगच्या अंगावर वानराने उडी मारुन खांद्याला चावा घेतला. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्यास देऊळगावराजा Deoulgaonraja येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच आदर्शनगरातील अमोल चव्हाण, दत्ता गाढे, नासेरखाँ पठाण, शारदा वायाळ, पुष्पा वायाळ, संतोष डुकरे यांच्यावर वानराने हल्ले करुन त्यांचा चावा घेतला. ज्यात त्यांना गंभीर दुखापत होऊन जखमी झाले. शहरात Jalna वेगवेगळ्या भागात वानरांनी मांडलेल्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.Seven Person Injured In Monkeys Attack In Jafrabad

शहरात वारंवार वानराच्या उच्छादामुळे त्रस्त झालेल्या मंगलसिंग बायस आणि मुकेश भारद्वाज यांनी वन विभागाचे वनपरिमंडळ अधिकारी ए.ए. राठोड, वनरक्षक सोनु जाधव यांच्याशी भ्रमणध्वणीव्दारे संपर्क साधुन जाफराबाद सुरु असलेल्या उच्छादाची माहिती देऊन वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनांची तत्परतेने दखल घेत माकडांना जेरबंद करण्यासाठी अंभई येथील प्राणिमित्र समाधान गिरी, संदीप गिरी, कृष्णा गिरी, सुनील दंडायत, अंकुश खिरडकर या पथकास जाफराबाद येथे पाठविले. वन विभागाच्या पथकांनी त्या वानरांचा शोध घेऊन आदर्शनगरात पिंजरा लाऊन वानरांना जेरबंद केले. त्यानंतर जाफराबाद शहरातील त्या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडत समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

SCROLL FOR NEXT