Latur News 
मराठवाडा

घरवापसीसाठी लातुरात साडेसात हजार अर्ज, पास घेऊन अनेकजण गावाकडे रवाना

विकास गाढवे

लातूर : टाळेबंदीमुळे अडकलेल्या विद्यार्थी, कामगार, यात्रेकरू व अन्य व्यक्तींना त्यांच्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. असे असले तरी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच गाव गाठावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत गावी जाण्यासाठी साडेसात हजार जणांनी ऑनलाईन अर्ज केले असून प्रशासनाला नऊ राज्य तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी संमतीही दिली आहे. यामुळे पास घेऊन अनेकजण गावाकडे रवानाही झाले आहेत.


जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी तातडीने पास देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना केली असून हे पथक अहोरात्र संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती मिळवण्यासाठी तसेच गावी जाणाऱ्यांना पास देण्यासाठी काम करत आहेत. दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाला साडेसात हजार अर्ज आले असून त्यानुसार यादी तयार करून कार्यालयाने संबंधित राज्य तसेच जिल्हा प्रशासनाकडून संमती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संमती आल्यानंतर तहसीलदारांकडे पास देऊन त्यांच्याकडून गावाकडे जाणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.

दिवसभरात नऊ राज्यांकडून ही संमती मिळाली असून महाराष्ट्रातील काही जिल्हाधिकाऱ्यांनीही संमती दिली आहे. यामुळे काहीजण पास घेऊन वैद्यकीय तपासणी करून गावाकडे रवानाही झाल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. दुपारी तीनपर्यंत आलेल्या सात हजार अर्जांवर प्रक्रिया झाली असून यातील तीन हजार ७२६ लोकांना गावी जाण्यासाठी वाहन आहे. तीन हजार २५६ लोकांकडे वाहन उपलब्ध नाही. संमती आल्यानंतर लोकांनी वाहनांचा शोध सुरू केला असून वाहन निश्चित करून पास घेण्यासाठी येत असल्याचे श्री.देसाई यांनी सांगितले. गावाकडे जाणाऱ्यांना नेऊन सोडण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावर मुख्यालय पातळीवर विचार सुरू असल्याचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

संचारबंदी पायदळी तुडवून बाजारपेठेत गर्दी, रेड झोनमधील रहिवाशीही बाजारात

संमती येण्यास सुरवात
जिल्हा प्रशासनाने यादी दिल्यानंतर संबंधित राज्य तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांकडून संमती येण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत दीड हजारांहून अधिक अर्जांसाठी संमती आली आहे. यात महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांसोबत परराज्यांकडूनही संमती आली आहे. यात तेलंगणाकडून २३६ , आंध्रप्रदेश - ३६५, उत्तराखंड - २७, ओरिसा - २१, गुजरात -१९, केरळ - ११, छत्तीसगड - ४, झारखंड - २०, राजस्थान - ३५५ तर उत्तर प्रदेश राज्याकडून ५७८ लोकांसाठी संमती मिळाल्याचे उपजिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT