shankar gadakh shankar gadakh
मराठवाडा

'शेतकऱ्यांना जुन्या खतांची विक्री जुन्या दरानेच करा'

सध्या खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु, जिल्ह्यात पूर्वीच्या दराचे खत यापूर्वी दाखल झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद: जिल्ह्यात खताच्या साठ्याची पडताळणी करून शेतकऱ्यांना जुन्या दराचे खत जुन्याच दराने विक्री करावे. दुकानदारांनी खताचा साठा आणि त्याचे दर दर्शनी भागात लावून अधिकाऱ्यांनी तपासणी करून घ्यावी. शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घ्याल तर परवाना रद्द होईल, असा इशारा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिला.

सध्या खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु, जिल्ह्यात पूर्वीच्या दराचे खत यापूर्वी दाखल झाले आहे. तरीही शेतकऱ्यांना नवीन वाढीव दराने तेच खत शेतकऱ्यांना दिले जाऊ शकते. दरम्यान, सध्या जिल्ह्यात जुन्या दराच्या खताचा किती साठा आहे. याबाबत माहिती घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार जुन्या दराने जिल्ह्यात आलेले खत शेतकऱ्यांना जुन्याच दराने मिळाले पाहिजे. त्यासाठी कृषी विभागाने खबरदारी घ्यावी. काही दुकानदार आणि खत विक्रेते जास्तीच्या दराने खताची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांनी याबाबत खुलेपणाने लेखी तक्रार द्यावी. प्रत्येक तालुकास्तरावर खताच्या बाबात काही अडचण असेल तर तक्रार देता येणार आहे. शिवाय काही दुकानदार खत उपलब्ध असूनही खत नसल्याचे सांगत आहेत. जर असे प्रकार घडले तर संबंधित खत दुकानदारावर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी खताची खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. एमआरपी किती आहे, याची खात्री करावी. त्यानुसारच खताची खरेदी करावी.

याशिवाय शेतकऱ्यांनी इ-पॉस मशीनची पावती दुकानदाराकडून घ्यावी. अन्य पावती खताच्या खरेदीसाठी ग्राह्य धरली जात नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी खताची खरेदी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक दुकानात दुकानदाराने उपलब्ध खताचा साठा आणि त्यांची किंमत दर्शनी भागात लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर काही दुकानात असे प्रकार दिसून आले नाही, तर त्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे करावी. त्यानुसार खत दुकानदारावर कारवाई केली जाईल.

पुरेसे खत उपलब्ध होईल
जिल्ह्यात सध्या जुन्या दराचे खत उपलब्ध आहे. दरम्यान, काही दुकानदार खताची टंचाई होईल, असे सांगत आहेत. शेतकऱ्यांना घाबरून कमी किमतीचे खत जास्तीने विक्री करण्याचे प्रकार घडू शकतात. सध्या जिल्ह्यात खताचा साठा पुरेसा आहे. याशिवाय अजूनही खत येणार आहे. त्यामुळे खताची टंचाई भासणार नाही. पुरेसे खत येईल, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या असून अपेक्षेपेक्षाही जास्तीचे खत जिल्ह्यात येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता, खताची खरेदी करावी. खताची भाववाढ झाली असली तरी साठा मात्र पुरेसा उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT