Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics
Sharad Pawar Ajit Pawar Mharashtra Politics Sakal
मराठवाडा

Sakal Survey : अस्तित्वासाठी झगडावे लागणार

दयानंद माने

Sakal survey - राज्याच्या राजकारणात कॉँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांबरोबरच शिवसेनेच्या दोन (उद्धव ठाकरे व शिंदे) तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन (शरद पवार व अजित पवार) अशा सहा प्रमुख राजकीय पक्षांसोबतच वंचित बहुजन, बीआरएस व इतर आणखी छोटे पक्ष अशी बहुरंगी व बहुविचारांच्या पक्षांची मांदियाळी आगामी निवडणुकांत असणार आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडाचा जबर फटका मराठवाड्यात शरद पवार यांच्या गटाला बसला आहे. विधानसभा, विधानपरिषद व राज्यसभा मिळून बारा लोकप्रतिनिधींपैकी (एक खासदार व अकरा आमदार) तब्बल सात आमदार खेचण्यात अजित पवारांना यश आले आहे. शरद पवार यांच्याकडे एक खासदार व चार आमदार राहिले आहेत. विधानसभेतील आठ आमदारांपैकी पाच आमदारांनी व विधानपरिषदेतील सतीश चव्हाण व विक्रम काळे या दोन्ही आमदारांनी अजित पवारांची पाठराखण केल्याने अजितदादांचा गट मराठवाड्यात सुसाट धावला आहे.

मराठवाड्यात विधानसभेच्या एकूण ४६ जागा आहेत. २०१९ मध्ये आकारास आलेल्या महाविकास आघाडीकडे (शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस) २८ जागा होत्या. शिवसेना व ‘राष्ट्रवादी’च्या विभाजनानंतर महायुतीकडे मराठवाड्यात तब्बल ३० जागांचे भक्कम पाठबळ आहे. त्यात भाजपच्या सर्वांत जास्त म्हणजे १६ जागा आहेत.

अजित पवारांना साथ देण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या रूपाने मोठी ताकद मिळाली आहे. पक्ष फुटीनंतर झालेल्या भाषणातही मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांना सर्वांत जास्त अपमान भोगावा लागल्याचे पहिल्यांदाच सांगून शरद पवारांच्या विरोधातील रोषाला मोकळी वाट करून दिली. धनंजय मुंडे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यात बीड जिल्ह्यातील राजकारणात विस्तवही जात नाही. आता नव्या समीकरणांत धनंजय मुंडेच सत्तेत आल्याने भाजपचे नेते त्यांना कशा पद्धतीने सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शरद पवार यांच्या राजकारणात मराठवाड्याला एक वेगळे स्थान आहे. १९८५ मध्ये समाजवादी काँग्रेसचे कॉँग्रेसमध्ये विलीनीकरण याच छत्रपती संभाजीनगर शहरात झाले होते. मराठवाडा विद्यापीठाच्या प्रदीर्घ चाललेल्या नामांतर लढ्याची सकारात्मक इतिश्री शरद पवार यांनीच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात केली होती.

सुंदरराव सोळुंके, साहेबराव पाटील डोणगावकर या दिवंगत नेत्यांप्रमाणेच कमलकिशोर कदम, अंकुशराव टोपे, पद्मसिंह पाटील आदी नेत्यांनी मराठवाड्यात पवार यांच्या पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळवून देण्याचे काम केले होते. मात्र नंतरच्या काळात बदलत्या राजकीय आव्हानांना सामोरे जाणारी दुसरी पिढी पक्षाला तयार न करता आल्याने या पक्षाचे पाठबळ कमी होत गेले. पक्षातच नेतृत्वाविषयी नाराजी बळावत गेल्याने पक्षफुटीला सामोरे जावे लागले.

सहा नेते मंत्रिमंडळात

एक वर्षांपूर्वी शिवसेनेचे तब्बल नऊ आमदार खेचून एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मराठवाड्याने मोठी साथ दिली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तब्बल तीन नेत्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली होती. हे तिन्ही मंत्री विविध कारणांनी वादग्रस्त ठरले आहेत आणि आता सत्तेत नव्या भिडूचा समावेश झाला आहे. धनंजय मुंडे व उदगीरचे तरुण आमदार संजय बनसोडे यांच्या समावेशाने मराठवाड्यातून आता तब्बल सहा मंत्री आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT